Type Here to Get Search Results !

आदिमधान्य महोत्सव व पाककृती स्पर्धा जनता विद्यालय आंगवली मध्ये संपन्न



संंगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील जनता विद्यालय व सृष्टीज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जनता विद्यालयात आदिमधान्य महोत्सव व पाककृती स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. 


🔵या महोत्सवाचे उद्घाटन नियामक मंडळाचे अध्यक्ष अशोक अणेराव यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच अरूणाजी अणेराव, ग्रा. पं. सदस्या प्रेरणा खांडेकर, पालक, शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.या महोत्सवामध्ये आदिमधान्यांचे नमूने ठेवण्यात आले होते. या धान्यांचे आहारातील महत्व यावर एस. के. कदम यांनी प्रास्ताविकातून माहिती दिली. 

🔵तसेच पाककृती स्पर्धेमध्ये १२ स्पर्धक गट सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या पाककृती विद्यार्थ्यांनी बनवल्या होत्या. या स्पर्धेत इयत्ता ७ वीच्या गटाने प्रथम क्रमांक, ९ वीच्या गटाने द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक बक्षीसे व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरवण्यात आले. स्पर्धेचे परिक्षण प्रेरणा खांडेकर व अरूणा अणेराव यांनी केले. बक्षीस वितरणप्रसंगी परिक्षकांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. व आदिमधान्यांच्या रोजच्या आहारातील महत्वाबाबत मार्गदर्शन केले. 

🔵या कार्यक्रमाचे औचित्य साधून शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय, खरवते येथील आलेल्या कृषीदूत विद्यार्थ्यांनी कृषी प्रदर्शन मांडले होते. या प्रदर्शनाचा लाभ उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी घेतला. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी नियामक मंडळाचे सचिव कुणालजी अणेराव,आयसीटी शिक्षिका वेदीका कदम विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.आर. चव्हान सर,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. शेवटी एक झाड सेनेचे आपल्या विद्यालयाचे अंतर्गत वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad