जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम असलेली वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील झोपडपट्टी येथील रस्ता हा गेल्या खूप वर्षापासून या रस्त्याला संरक्षण भिंत नसल्यामुळे आता पर्यंत चार वेळा खाली गेल्यामुळे याचा फटका येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे त्यामुळे आज दिनांक ४ ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार आणि गटविकास अधिकारी जव्हार यांना निवेदन देवून नागरिकांनी मागणी केली आहे.
जव्हार ते नाशिक अशा हा मुख्ख रस्ता असून या आधी यांचे काम झालेले होते परंतु पावसाचे अतीप्रहवामुळे ती भिंत आणि रस्ता देखील खाली गेल्यामुळे बेहेडपाडा ते जव्हार बस सुरुळीत चालू होती परंतु हा रस्ता खाली गेल्यामुळे बस बंद झाली आहे याचाच परिणाम येथील नागरिकांना आणि शालेय विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे एखाद रुग्ण जास्त सिरियस असेल तर त्या ड्रायवर ला डोळ्यात तेल घालून आणि मुठीत जीव घेवून गाडी चालवावी लागत आहे. त्यामुळे या घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता आणि संरक्षण भिंत लवकरात लवकर बांधावे अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.