स्व. सुधाकर पंत परिचारक यांचा तृतीय पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करोळे येथे संपन्न
करोळे गावातील श्री विठ्ठल मंदिर येथे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या तृतीय पुण्यस्मरनाचा कार्यक्रम करोळे गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत विनम्र अभिवादन करून पार पडला.
या कार्यक्रमासाठी करोळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता व भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर लोकांना चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती.
मा.आमदार,राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष, कर्मयोगी स्व सुधाकर पंत परिचारक ( मोठे मालक) यांचे आज तृतीय पुण्यस्मरण. त्यांचे सहकार,बँक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्य सुवर्णाक्षरांनी लिहिली जावीत.साखर कारखाना चालवत असताना शेतकऱ्यांचे हित जोपासले. गरजू,नडलेल्यांचे प्रश्न सोडवताना राजकारण केले नाही.स्वच्छ प्रतिमा सोडली नाही.अशा कर्तृत्ववान, ऋषीतुल्य मालकांना शतशः नमन