आज रोजी कारगील विजय दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि रोटरी क्लब Midtown, safety welfare association, विविध शाळा, RSP शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी आठ वाजता रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
यादरम्यान विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत क़्विविध पोस्टर्स, बॅनर्स व्दारे जनागृती केली. यामध्ये 12 शाळा, 205 विद्यार्थी, 40 शिक्षक सहभागी झाले होते.
कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व या ठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करीत रॅली ची सांगता झाली.
प्रतिनिधी/ भानुदास गायकवाड