दिनांक 13 -07-2023 रोजी 03.00 ते 03.30 सुमारास पटेल आर मार्ट च्या समोर शास्त्री नगर हॉस्पिटलच्या समोर, कोपर रोड, डोंबिवली पश्चिम या ठिकाणी मुन्नीराम सहानी रात्रपाळी सिक्युरिटी गार्ड म्हनुन कर्तव्यावर असताना पाऊस आला म्हणून दुकानासमोर तीन चाकी टेम्पो मध्ये आराम करत होते. सदर वेळी यातील आरोपी हर्षद कुशाळकर वय वर्ष 24 हा युवक मुन्निराम शहानि यांच्या जवळ गेला व दारू पिण्यासाठी पैसे मागून वॉचमन साठी असलेली खुर्ची बसण्यास मागितली त्यावेळी यांनी त्यास नकार दिला ,म्हणून रागाच्या भरात आरोपी याने जखमीला शिवीगाळ करून दमदाटी करून जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात प्रथम बाजूला पडलेला दगड व नंतर पेविंग ब्लॉक घालून गंभीर जखमी केले.
जखमीस प्राथमिक उपचार शास्त्रीनगर हॉस्पिटल डोबिवली या ठिकाणी उपचार करून पुढील उपचाराकरता कळवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर मीरा रोड येथे खाजगी ऑर्बिट या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तसेच विष्णूनगर पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील कारवाई चालू असल्याचे विष्णूनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या कडून सांगण्यात आले.
प्रतिनिधी / भानुदास गायकवाड