गोठणे पुनर्वसन येथील जि.प. मराठी शाळेतील विद्यार्थ्याना श्री गांगोबा प्रतिष्ठान संस्थेच्या मार्फत विविध शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले.
ईयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्याना वह्या,पेन्सिल बॉक्स,चित्रकलेची वही,कलर पेन,कंपास पेटी,एक्झाम पॅड ईत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री कृष्णाजी माईन यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ रेश्मा प्रकाश जाधव मॅडम यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले व संस्थेने विद्यार्थ्यांना दिलेल्या शालेय वस्तू वाटपाबद्दल श्री गांगोबा प्रतिष्ठान संस्थेचे आभार मानले व संस्थेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यानी दिल्या.
श्री गांगोबा प्रतिष्ठान संस्थेचे सेक्रेटरी श्री कृष्णाजी माईन,व्यवस्थापक श्री.संजयजी माईन,प्रदिपजी सापते,दिपकजी भेरे,पांडुरंगजी माईन, श्री. हरिचंद्र माईन.रमेश जयराम शिवगण सर ,मुग्धा सुर्वे मॅडम, ग्रामस्थ प्रकाश हुडे,समाजसेवक सुनिल हूडे,दिपक घाग शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष साक्षी संतोष चव्हाण अंगणवाडी मदतनीस प्राजली मुंडे आणि ग्रामस्थ दिपक चव्हाण उमेश कानर उपस्थित होते.