Type Here to Get Search Results !

जव्हार महाविद्यालयात शोक सभेचे आयोजन



जव्हार :-सोमनाथ टोकरे 


 गोखले एज्युकेशन सोसायटीचे महासंचालक व सचिव सर डॉ. मो. स. गोसावी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी दिनांक ९ जुलै २०२३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या अकस्मात घडलेल्या घटनेने संपूर्ण गोखले एज्युकेशन परिवार दुःखाच्या सागरात बुडाला. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण शिक्षण शिक्षण व्यवस्थेमध्ये एक पोकळी निर्माण झाल्याची जाणीव झाली. दिनांक १३ जुलै २०२३ रोजी जव्हार महाविद्यालयात गं. भा. सरदार हॉलमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीचे माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित मान्यवर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी आदरणीय सरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसत होती. प्रत्येकालाच गोसावी सरांचा आणखी सहवास लावावा याची हुरहूर लागून होती.

 शोक सभेमध्ये बोलताना अनेक मान्यवरांचे मन भरून येत होते. व प्रत्येक जण गोसावी सरांबरोबरचे आपले अनुभव कथन करत होता. यातूनच सरांचा संपूर्ण जीवनपट उलगडत गेला व सरांची उंची सर्वांना कळाली. सरांचा १९३५ ते २०२३ या ८८ वर्षांमध्ये केलेल्या कामाचा संपूर्ण आलेख उलगडण्यात आला. गोसावी सरांचा शैक्षणिक प्रवास, सामाजिक प्रवास, आध्यात्मिक प्रवास अशा विविध पैलूंचा खुलासा झाला. प्राचार्यांचे प्राचार्य, सारस्वतांचे सारस्वत, व्यवस्थापन शाखेचे प्रणेते अशा अनेक कार्याचा आढावा घेण्यात आला. गोखले एज्युकेशन सोसायटी या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतातून अनेक वरिष्ठ मान्यवरांनी शोक संदेश पाठवले. यावरूनच समाजात सरांची उंची किती आहे याचा अंदाज येतो. 

या शोक सभेमध्ये अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.आर. मेश्राम होते,तसेच यावेळी उपप्राचार्य डॉ हेमंत मुकणे,जव्हार मधील प्रतिष्ठित नागरिक व महाविद्यालय विकास समिती सदस्य दिलीप दादाशेठ तेंडुलकर, अर्बन बँकेचे उपाध्यक्ष प्रवीण मुकणे ,माजी विद्यार्थी नितीन पाटील , के. व्ही हायस्कूलचे प्राचार्य दिलीप उदमले सर, जव्हार महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य व खोडाळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल पाटील इत्यादी मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करून आदरणीय सर डॉ. मो. स. गोसावी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य वसंत धांडे व सुनील वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक शैलेश बगडाने यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad