Type Here to Get Search Results !

ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते कधी होणार नागरिकांचा सरकारला सवाल.



जव्हार,:-सोमनाथ टोकरे 


    पालघर जिल्ह्याची रचना सागरी नांगरी आणि डोंगरी अशी आहे. त्यातच जव्हार तालुका हा डोंगराळ भाग असून पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार तालुका हा मीनी महाबळेश्वर आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.जव्हार हॆ थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिवर्षी पावसाची नोंद ही मोठ्या प्रमाणात होत असते. जव्हार तालुक्यातील पहि ल्याच पावसात दाभेरी ते जव्हार प्रशासनाने कोटी रुपये खर्च करून पहिल्या पावसात रस्ता खजला आहे. जून महिना संपायला आला तरीही पाऊस पडण्याचे चिन्ह दिसत नव्हते मात्र दिनांक २४ जुलै सकाळपासून ढगाळ वातावरण झाल्याने वादळी वाऱ्यासह रविवारी दिनांक २५ जुलै रात्री एकाएकी हजेरी लावल्याने जव्हार तालुक्यातील आज ६ दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने दाभेरी ते जव्हार कडे जाणारा मुख्ख रस्त्याची चांगलीच तारांबळ उडाली आली जव्हार तालुक्यातील ६ दिवसात १८७ .३ सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

   जव्हार पासून २५ किलोमिटर अंतरावर असलेले दाभेरी गाव असल्यामुळे या भागात दळणवळणाच्या किंवा इतर सोयी सुविधा नसल्याने येथील नागरिक हा थेट जव्हार येथे जात असतो परंतु दाभेरी ते कायरी दरम्यान बेलीचा वळण असलेला घाटाच्या पुढे अनेक ठिकाणी रस्त्या उखडला असून मजबूत रुंदीकरण झाले नसल्यामुळे आणि मोरी दुरुस्त न झाल्याने त्याच्यात एक खडा तीन मिटर जमिनीखाली गेल्यामुळे वाहनांना येण्या जाण्या साठी साईट द्यायला त्रास होत आहे.गेल्या वर्षी पावसाळा मध्ये या खड्यात एक गाडी पडली होती त्यामुळे हा रस्ता आता खूपच धोकादायक ठरला आहे.

  प्रधानमंत्री ग्रामसडक योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राज्यात सन २००० साली राबविण्यात आली असून या योजनेची ग्राम विकास विभागाच्या महाराष्ट्र ग्रामीण रस्त्ये विकास संस्थेमार्फत करण्यात येतात या योजनेचा मुख्ख उद्देश हा सण २००१ जनगणणेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात वर्षभर चालू राहणारे कलव्हर्ट व क्रॉस ड्रेनेज बांधून जोडणे हा आहे परंतु आमच्या ग्रामीण भागात एकदा काम झाल्याने ठेकेदार व इंजिनियर आणि पिडिअफ हे साधं ढुंकूनही पाहत नसल्याबाबत ग्रामस्थांची नाराजी व्यक्त केले आहे आता तरी या बातमीचा बोध घेवून या घटनेची प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी अशी येथील नागरिकांची मागणी आहे.


बॉक्स


आमचा गाव अतिदुर्गम भागात असल्याने विकासापासून खूपच वंचित असल्यामुळे

 या ठिकाणी आश्रमशाळा असल्याने किंवा जिल्हा परिषद शाळा चे शिक्षक हे या ठिकाणी न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात आणि हा रस्ता जास्त धोकादायक ठरला तर याचा परिमाण शाळेतील विद्यार्थ्यांना वर होईल.( कृष्णा पिलाने दाभेरी ग्रामस्थ )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad