जव्हार:-सोमनाथ टोकरे
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जव्हार ते झाप १७ किमी
अंतरावरचा प्रवास खडतर व जीवघेणा झाला असून,जव्हार पासून १० किमी अंतरावर पोंडीचापाडा या ठिकाणी असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असून , या रस्त्यावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.यापूर्वीही या रस्त्यावरून प्रवास करताना कित्येक नागरिकांना आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे.
खरंतर या रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गावात नागरिकांना जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी नसल्याने याच मार्गावरून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.जव्हार तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे येथील नदीला पुर आले आहे. अति महत्वाच्या कामासाठी नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणे जावे लागते. परंतु पोंडीचापाडा या ठिकाणी नदीपात्राला आलेल्या पुराणे रौद्ररूप धारण केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून पुलावरून पुराचे पाणी सातत्याने वाहत आहे.
हवालदिल झालेल्या नागरिकांना पर्यायी रस्ता नसल्याने आपला जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. याठिकाणी कित्येक नागरिकांनी पावसाळ्यात प्रवास करत असताना आपला जीव गमावलेला आहे.दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे जीकरीचे होत असते. परंतु या गंभीर बाबीकडे शासनाचे लक्ष का जात नाही असा प्रश्न येथील स्थानिक नागरिकांना पडला आहे. या रस्त्याने प्रवास करताना आणखीन किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल याचे उत्तर येणारा काळच देईल.खेदाची बाब अशी की,
शासन स्तरावर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना अद्याप झालेली नाही.
तात्काळ याठिकाणीणी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी येथील जनतेची मागणी आहे.