Type Here to Get Search Results !

डोंबिवली | स्टेशन परिसरात रिक्षावाल्यांच्या मनमानीला चाप.



   डोंबिवली पश्चिमेला रेल्वे स्टेशन गेट समोर नेहमीच  रिक्षावाल्यांची मनमानी बागायला मिळते स्टेशन च्या एकदम पायऱ्यांजवळ आणून प्रवासी सोडणे, प्रवासी घेणे यामुळे  होणारी रिक्षचालकांची गर्दी कमी करण्यासाठी व रेल्वेने प्रवास करनाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा या उद्देशाने स्टेशन कडे प्रवासी घेवून येणाऱ्या रिक्षचालकांनी सर्वच मार्गाने रेल्वे स्टेशनकडे घेवून येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्टेशन मुख्य गेट पासून ठराविक अंतरावरच प्रवासी उतरावीत.




ज्यामुळे स्टेशन परिसरात एकाच ठिकाणी होणारी रिक्षचालक, प्रवाशांची गर्दी कमी होईल व वाहतूकोंडी होणार नाही. या उद्देशाने डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्वच मुख्य रस्त्यांवर *"परतीचे प्रवासी येथे उतरावेत, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल"या आशयाचे फ्लेक्स लावण्यात आले असून याबाबत रिक्षाचालक व प्रवासी यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली आहे. यामध्ये कसुरी करणाऱ्या  कारवाई करण्यात येणार आहे.




     स्टेशन परिसर वाहतूक कोंडी मुक्त राहण्यासाठी डोंबिवली वाहतूक शाखेकडून सर्व रिक्षाचालक व प्रवासी यांना नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे की, रिक्षाचालकांनी परतीचे प्रवासी हे वाहतूक शाखेकडून नेमून दिलेल्या ठिकाणीच उतरावेत तसेच प्रवाशांनी सुद्धा रिक्षा चालकाकडे कुठलाही गैरवाजवी आग्रह न करता परतीचे प्रवासी उतरण्याच्या ठिकाणीच उतरून सर्व रिक्षा चालकांना व वाहतूक शाखेला सहकार्य करावे. असे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.


प्रतिनिधी / भानुदास गायकवाड



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad