जव्हार :-सोमनाथ टोकरे
जव्हार तालुक्यातील ग्रामीण व अतिदुर्गम असलेली वावर वांगणी ग्रामपंचायत पैकी सागपाणी व रीठीपाडा या गावात पाणी टंचाईचा तीव्र झळा जाणवू लागला आहे वावर वांगणी परिसरातील सागपाणी व रिठीपाडा गावात सद्यस्थितीत टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे .शासनाकडून येणारा टँकर विहरित खाली होताच पाण्यासाठी महिलांची झुंबड उडत असून प्रसंगी महिलांमध्ये भांडण देखील होत आहेत .
वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील सागपाणी आणि रीठीपाडा दोन्ही पाड्यांना प्रतिदिन स्वतंत्र १ टँकर पोहचवला जात आहे परंतु वावर वांगणी पासून काळशेती हे कमीत कमी ५५ ते ६० किलोमिटर अंतरावर असल्याकारणाने टँकर हा पाणी पूर्ण भरून येत नाही त्यामुळे विहरीत पाणी शिल्लक साठा केला जात नसल्याने टँकर विहरीत खाली होताच महिलांची झुंबड उडत असते .महिला विहरीच्या कठड्यावर उभ्या राहून पोहऱ्याने पाणी काढत असतात यातून गावातील महिलांमध्ये वाद देखील होत असतात सागपाणी व रीठीपाडा या गावातील लोकसंख्या जवळपास १ हजार हून अधिक आहे.त्यातच एक एक दिवस काही कारणाने टँकर ची दांडी होत असल्याने सागपाणी व रीठीपाडा महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी शेजारची दाभेरी ग्रामपंचायत पैकी डाहुळ या पाड्यात ४ ते ५ किलोमिटर अंतरावरून पाणी आणण्यासाठी जावं लागतं आहे त्यातच या वर्षी नवनिर्वाचित सरपंच युवा विनोद बुधर हा असल्याने सगळ्या नागरिकांना विश्वास ठरला होता की खूप वर्षांपासून आमच्या गावात पाणी टंचाई येत असून या वर्षी नाहीशी होणारा परंतु तस न होता जी परिस्थिती होती तशीच आज पण बघायला मिळत आहे.
वास्तविक प्रशासनाने जलजीवन अंतर्गत प्रती मानसी ५५ लिटर पाण्याची तरतूद करून गाव - पाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करणे किंवा टँकरची ट्रीपची संख्या वाढवून किंवा जव्हार तालुक्यातील कमी अंतरावरून पाणी पुरवठा केल्यास टंचाई भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देता येईल.दरवर्षी निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी व जव्हार तालुका टँकर मुक्त करण्यासाठी शासनाने व प्रशासनाने यांनी विशेष लक्ष द्यावे .अशी अपेक्षा जन सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.