जव्हार :- प्रतिनिधी
श्रीगगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था जामसर ता. जव्हार जिल्हा पालघर यांच्या वतीने आदिवासी दुर्गम भागात सुरू असलेल्या अनुदानित आश्रम शाळा हिरडपाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या ,पेन,, पट्टी ,पेन्सिल , पाटी, शालेय गणवेश ,चटई व इतर आवश्यक साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप नारायण पटेकर, सदस्य नकुल पटेकर ,आदिवासी विकास विभागातील निरीक्षक तथा कार्यालयातील प्रतिनिधी महेश वराडे, शिक्षक मित्र किशोर हिंडवे व शाळेचे मुख्याध्यापक गणेश उदावंत व मेदगे सर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक गणेश उदावंत यांनी शाळेतील उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, शाळेतील संगणक व शिवणकाम प्रशिक्षण देऊन सर्टिफिकेट कोर्स सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत शिकविले जातात. तसेच आदिवासी विकास विभागातील दिलेल्या निर्देशानुसार गुणवत्ता वाढीसाठी उपक्रमाची माहिती दिली.सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.जी. पाटील पदवीधर शिक्षक यांनी केले.