Type Here to Get Search Results !

जव्हार इकॉलॉजी सेंटर आयोजित पहिला मानवनिर्मित देवराई प्रकल्प वडोली येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.



जव्हार :-सोमनाथ टोकरे .


 दिनांक २७ जून २०२३ रोजी वडोली गावठण येथे ग्रामपंचायत वडोली, निसर्ग फाऊंडेशन व जव्हार ईकॉलॉजी सेंटर यांच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पालघर जिल्ह्यातील पहिला मानवनिर्मित देवराई प्रकल्प ग्रामपंचायत वडोली येथे निर्माण केला असून ग्रामपंचायत वडोली च्या लोकनियुक्त महिला सरपंच कमिनी दीपक गावंढा व निसर्ग फाऊंडेशन चे चिराग कातरनी  यांच्या हस्ते स्वदेशी झाड लावून प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. व उपस्थित ग्रामपंचायत उपसरपंच रघुनाथ भोये, ग्रामपंचायत सदस्या ,ग्रामसेविका मीरा वाघमारे मॅडम,व निसर्ग फाऊंडेशन सर्व टीम,मुबंई सस्ट्रेनेबीटी सेंटर व जव्हार ईकॉलॉजी सेंटर संस्थापक निसर्ग प्रेमी रुषी अग्रवाल, प्रकल्प प्रमुख प्रियांका पाखरे, जव्हार महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. अविनाश अडशूळ सर प्रकल्प समन्वयक मनोज कामडी,निसर्ग प्रेमी यांच्या उपस्थितीत देवराई प्रकल्प उभा केला असून यामध्ये जंगली व औषधी गुणधर्म असलेली  खरसिंग ,जांभूळ,मोह,करंज

टेटू,पांढराकुडा,चामेल,रतनगुंज,सावर,खजूर,शिद,बेहडा,तोरण चिंच,अर्जुन,उंबर,बांबू,आंबा,पिंपळ,पेरू,करवंद, इत्यादी  जवळपास ४५० स्वदेशी झाडांची लागवड केली असून या वनस्पती महत्व व गुणधर्मव प्रकल्पा विषयी व देवराई विषयी डॉ. अविनाश अडशूळ यांनी मार्गदर्शन केले .सदर दवराई प्रकल्प हा ग्रामपंचायत वडोली अंतर्गत असलेल्या १एकर जागेत केला असून सदर प्रकल्प मध्ये दहा वर्ष झाडाची देखरेख करण्याचे काम जव्हार ईकॉलॉजी सेंटर मार्फत केले जाईल तसेच सदर झाडापासून मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायत ला मिळेल तसेच सदर झाडांपासून गावाला शुद्ध हवा मिळण्यास सुरवात होईल असे एकूण जव्हार तालुक्यात जव्हार ईकॉलॉजी सेंटर च्या वतीने दहा मानवनिर्मित प्रकल्प सुरू करण्याचा मानस आहे त्यामुळे ज्या गावांना मोकळी जागा उपलब्ध असल्यास जव्हार ईकॉलॉजी सेंटर जव्हार महाविद्यालय यांच्यासोबत संपर्क करण्याचे आवाहन यावेळी केले.शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा  समारोप केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News