Type Here to Get Search Results !

हिंगोली | नरसी नामदेव येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी



हिंगोली तालुक्यातील संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या नरसी नामदेव येथे एकादशीनिमित्त भाविकांचे दर्शनासाठी गर्दी जमली होती सकाळीच संत नामदेव महाराज संस्थांच्या वतीने महापूजा करण्यात आली.




यावेळी संस्थांचे सचिव द्वारकादास सारडा विश्वस्त भिकुलाल बाहेती डॉक्टर राहुल नाईक मनोज आखरे. भागवत सोळंके. ज्ञानेश्वर कीर्तनकार. रमेश महाराज मगर. मंडळ अधिकारी पारीस्कर. अशोक काळे.तसेच यांचे सह भावीक भक्त मोठ्या संख्येनेउपस्थित होते आषाढी एकादशी निमित्त हिंगोली चे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सुद्धा नामदेव समाधीचे दर्शन घेतले.या वेळी पोलीस निरीक्षक मळघने.कांता घोंगडे.संतोश टेकाळे.आडहोकेट के.के.शिंदे.कवी शिवाजी कऱ्हाळे उपस्थित होते. सकाळी पाच वाजल्यापासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बेल फुलाचे दुकानांबरोबरच मिठाईचे दुकान सुद्धा फार मोठ्या संख्येत थाटली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त पोलीस अधीक्षक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली खडक होता.

तसेच आरोग्य कर्मचारी सुद्धा दिवसभर नरसी नामदेव मंदिर परिसरात उपस्थित होते. माणिक लोडे यांनी आलेल्या भाविक भक्तांसाठी साठी मोफत फळांची व्यवस्था केली होती. काळकोंडी येथील ग्रामस्थांनी मोफत पादत्राणे सांभाळण्याची व्यवस्था केली.

 रांगेतील भाविकांना प्रथमदर्शनाचा मान यावर्षी कल्पना गणेश तडस,गंगाबाई माधव वानखेडे यांना मिळाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies