मोखाडा .जव्हार मोखाडा सारख्या आदिवासी ग्रामीण भागात युवा समाज प्रबोधन रंगभूमी युवा मंडळ गेले 6 वर्ष सातत्याने समाज प्रबोधनाचे काम करत आहे .ग्रामीण आदिवासी भागात अनिष्ट चाली रिती व परंपरा या विषयावर गावात गावात जाऊन पथ नाट्य सादर करून समाज प्रबोधन करण्याचं काम करत आहे .या मध्ये बाल विवाह , कुपोषण, अंधश्रद्धा इत्यादी सामाजिक विषयवार ह्या मंडळातील युवक व युवती स्वरचित व स्थानिक भाषेत पथ नाट्य तयार करून गाणे तयार करून गावा गावात जाऊन पथ नाट्य सादर करत आहेत .
परंतु या वेळेस त्यांनी एक आगळा वेगळा उपक्रम चालू केला आहे
जिल्हा परिषद सदयस श्री.हबीब भाई शेख यांच्या मार्गदर्शनखाली युवकांनी लोक हक्क नावाची चळवळ चालू केली आहे या मध्ये आदिवासी ग्रामीण भागातील लोकांना शासकीय योजना याच्या परिपूर्ण माहिती व मूलभूत हक्क विषयी जन जागृती व्हावी म्हणून चळवळ चालू केली आहे या मध्ये आदिवासी ग्रामीण भागातील जनतेला शासकीय योजना त्याच बरोबर शासकीय कार्यालयात रखडलेले काम याच विषयी पुर्ण माहिती त्या बद्दल चे आपले हक्क व अधिकार या विषयी जन जागृती याचे काम लोक हक्क चळवळी मार्फत केले जाणार आहे ..
मोखाडा सारख्या आदिवासी ग्रामीण भागात शासकीय काम हे एका फेरीत होत नाही या साठी लोक हक्क चळवळ मधील सहभागही युवक हे गावो गावी जाऊन मार्गदर्शन करणार आहेत त्याच बरोबर समाजाला शासकीय प्रमाण पत्र व ऑनलाईन काम काज स्थानिक पातळीवर व्हावे म्हणून मोरचोंडी येथे
लोक हक्क जन सेवा केंद्र चे उदघाटन केले आहे या कार्यालय विद्यार्थ्यांना लागणारे सर्व शासकीय प्रमाण पत्र हे माफक शुक्ल आकारून मिळणार आहेत त्याच बरोबर करिअर मार्गदर्शन व डीजीटल साक्षरता अभियान अंतर्गत विदर्थ्याना मोफत संगणक प्रशिक्षण दिले जाणार आहे .त्याच बरोबर समाजातील वंचित व दुर्बल घटकांना आवश्यक ती सामाजिक मदत या कार्यालयामार्फत केली जाणार आहे या कार्यालयाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदयस श्री हबीब भाई शेख यांचा हस्ते पार पडला.
या वेळी मोर्हाडा गोंदे बू ग्राम पंचायत चे सरपंच श्री देविदास निसाळ, सदयस श्री मधुकर आचारी त्याच बरोबर बेरिस्ते ग्राम पंचायत सरपंच व लोक हक्क प्रतिनिधी श्री. हिरामण मौळे, सामाजिक कार्यकर्ते जमशिद शेख त्याच बरोबर लोक हक्क चे प्रमुख श्री रामदास लहारे व त्यांचे सर्व स्वयंसेवक कु.महेंद्र भाऊ जाधव,कुं.रमेश जयराम निसाळ,कु.जयेश जाधव,कु. चंदर नेवजी वाघरे,कु.रेमश लहारे , कु.रमेश निसाळ,कु.नंदकुमार लहारे,कु. हेमंत जाधव . श्री. नरेश भोये,श्री.भानुदास भोये,श्री. पांडुरंग जाधव,श्री.दत्तू भोये,श्री. चंदर जाधव व ग्रापंचायत मधील ग्रामस्थ उपस्थित होते .
प्रतिनिधी .रामदास लहारे
मोखाडा