राष्ट्रवादी बैठक समितीने पवारांचा राजीनामा फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवड समितीची आज पक्ष कार्यालयात बैठक पार पडली आहे. या बैठकीत समितीने पवारांचा राजीनामा एकमताने फेटाळला आहे. पक्षाचे अध्यक्षपदी शरद पवारांनी कायम रहावे असा निर्णय समितीने घेतला आहे. बैठकीसाठी राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. कित्येक पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर समितीने आज पवारांनीच अध्यक्षपदी कायम रहावे असा प्रस्ताव मंजूर केला आहे.