कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला आपलं खातं देखील उघडता आलं नाही. या विषयाचा धागा पकडून भाजप नेते आशिष शेलारांनी संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. ते म्हणाले, 'महाराष्ट्र एकीकरण समिती बाबतचा निकाल दुर्दैवी आणि अनाकलनीय आहे. पण जिथे जिथे संजय राऊत जातील, तिथे तिथे त्यांच्या लोकांचा पराभव होईलच. संजय राऊत तिथे गेल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीला झटका बसला, हे त्यातील सत्य आहे