संत एकनाथ महाराजांचे शिल्प मंदिर कोसळले.
पंढरपूर येथील प्रसिद्ध असलेल्या तुळशी वृंदावनामधील संत एकनाथ महाराजांचे शिल्प मंदिर आज कोसळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ड्रीम प्रोजेक्टला धक्कादायक बसला आहे.
दोन महिन्यांपूर्वी तुळशी वृंदावनातील संत चोखामेळा मंदिर कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता संत एकनाथ महाराज मंदिर कोसळले आहे. यामुळे निकृष्ट काम झाल्याचं समोर आले आहे. या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.