Type Here to Get Search Results !

आमदार साहेब राजीनामा द्या शासकीय अधिकारी जुमानत नसल्याचे भीषण वास्तव समोर?



आमदार साहेब राजीनामा द्या शासकीय अधिकारी जुमानत नसल्याचे भीषण वास्तव समोर?


सध्या देशात व राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असतानाही पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना पंढरपूरातील शासकीय अधिकारी जुमानत नसल्याचे भीषण वास्तव समोर दोन्ही तालुक्यात पर्यटन विभागाचा निधी मिळावा यासाठी आ. आवताडे यांनी पर्यटन विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे पाठपुरावा करून पाच कोटीचा निधी मिळावा म्हणून 20/1/2023 रोजी पत्र देऊन विनंती केली होती.या वरती मंत्रीमहोदय यांनी तत्काळ जिल्हाधिकारी यांना तपासणी करण्या बाबत आदेश दिले होते.


यानुसार जिल्हा नियोजन समितीकडून कार्यवाही करण्यात आली. या मध्ये फक्त मंगळवेढा येथील संबंधित अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रक सादर केल्याने त्याठिकाणी २.५ कोटी निधी मंजूर झाला. मात्र पंढरपूर तालुक्या तील अंदाजपत्रक सादर न केल्याने हा निधी परत गेला आहे, ही निश्चितच खेदजनक बाब आहे. दोन्ही तालुक्यातील कामाचे अंदाजपत्रक देण्यासाठी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करूनदेखील मंगळवेढा तालुक्याचे अंदाजपत्रक लवकर मिळाले व पंढरपूरातील अंदाजपत्रक लवकर मिळाले नाही.त्यामुळे निधी मिळू शकला नाही यामुळे जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यावरती तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार आवताडे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे मस्तवाल अधिकाऱ्यांची मस्ती जिरवण्यासाठी व त्यांचा निषेध करण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे.


सध्या पंढरपूर मंगळवेढा या ठिकाणी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे दोन मोठे नेते असतानाही अधिकारी जुमानत नसल्याने हा चर्चेचा विषय बनला कारण आमदार समाधान आवताडे हे सरकारकडून निधी खेचून आणत असताना मंगळवेढा येथील मुख्याधिकारी प्रस्ताव सादर करतात त्यामुळे लगेच निधी मिळत असतो मात्र पंढरपूरचे मुख्याधिकारी हे नेमके प्रस्ताव सादर करण्यासाठी टाळाटाळ का करतात? का त्यांच्यावर कोणत्या नेत्याचा दबाव आहे? विशेष म्हणजे जर आमदार समाधान आवताडे यांनी निधी आणला तर त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल आणि पंढरपुरात आवताडे गट स्ट्रॉंग होईल या भितीनेच अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारणाचा चुकीचा पायंडा तर पाडला जात नाही ना अशी शंका आता पंढरपूरातील लोकांना येत आहे हे जनतेसमोर आले पाहिजे अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी घेतलेली आहे. एखादा आमदार विरोधी पक्षामध्ये असल्यास आपण समजून घेवू शकतो मात्र आ. आवताडे हे सत्ताधारी भाजपचे आमदार असतानाही त्यांच्यावर ही वेळ येत असेल तर अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. जर कारवाई होणार नसेल तर आमदार समाधान आवताडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देवून त्याचा निषेध करावा? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदे यांनी दिलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News

Hollywood Movies