लोह्यात काँग्रेस च्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजण
लोहा प्रतिनिधी :- शिवाजी मुंडे
लोहा शहरातिल शिवकल्याण नगर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवांसाठी लोहा काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान निमित शुभेच्छा दिल्या. तर विरोधकांना शेरोशायरी मधुन टोला लगावला.सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र उपासाचा रमजान महिना सुरू असुन हिंदू - मुस्लिम बांधवांमध्ये भाईचारा असावा यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत शहरात लोहा शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने शिवकल्याण नगर येथे दि.२० एप्रिल रोजी इफ्तार पार्टचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सदरील कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ. मोहन अण्णा हंबर्डे, आ. अमर राजूरकर, नांदेड मनापचे स्थायी समितीचे माजी सभापती किशोर स्वामी, सिने अभिनेते अनिल मोरे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते संतोष पांडागळे, काँग्रेसचे लोहा तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार, शहराध्यक्ष सोनू संगेवार काँग्रेसचे कंधार तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे , माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ, कोषाध्यक्ष शिवाजी आंबेकर, सरपंच अण्णाराव पाटील पवार, माजी नगरसेवक पंकज परिहार , शरफौदीन शेख, भूषण दमकोंडवार,शिवा पवार हरी शिंदे पांडुरंग शेटे, सतार शेख शिवाजी मुंडे जीलानी शेख यांच्या सह मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की, मुस्लिम बांधवांना मी सर्व प्रथम रमजान महिन्याच्या शुभेच्छा देतो त्यांचे धन्यवाद मानतो मला रोजा इफ्तार मध्ये भाग घेता आला . देवाच्या आशिर्वादाने आपल्याला चांगल्या कामाला कुणीही रोखू शकत नाही. येथे माझी मौलानाशी चर्चा झाली मौलानानी सांगितले ते सातसतुरी उर्दू अरबी मधुन दुवा मागत होते देशातील देशातील हिंदू, , दलित,शीख,इसाई या सर्वांच्या जीवाचे व मालमत्तेचे रक्षण देवानी करावे अशी दुवा मागितली आहे. सर्वांच्या मनात एकच आहे देशांत शांती व जातीय सलोखा राहावा हिंदू मुस्लिम एकत्र राहावे ईद व नवरात्र सुखाने साजरी व्हावी कुणाची तक्रार राहू नये. इम्रान भाई शायर हे खासदार झालेत त्यांच्या शेरोशायरी तुन त्यांनी विरोधकांना टोला मारला "आपस मे जो टकराने जो चाहते है उनके लिये ये शेर है; ' दुश्मनी जम के कर पर गुंजाईस ये रख जबी कोई दोस्ती करने का मौका आए तो शरमिंदा ना हो ' या शेरोशायरीतुन विरोधाला टोला मारला व यावेळी उपस्थितातून टाळ्यांचा कडकडाट झाला .
तसेच यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू संगेवार यांनी केले. यावेळी सोनू संगेवार म्हणाले की सध्या मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे सामाजिक बांधिलकी जोपासत मुस्लिम समाज बांधवांसाठी आजचा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लोहा शहरात पाच मज्जित आहेत यावेळी या पाच मशिद मधील सदरला व त्यांच्या सोबत लोहा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना या इफ्तार पार्टीसाठी आंमत्रीत केले आहे व या प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आले आहेत आम्ही दरवर्षी इफ्तार पार्टी ठेवणार आहोत व दरवर्षी अशोकराव चव्हाण साहेबांनी या पार्टीला यावे असे सोनू संगेवार म्हणाले.
यावेळी यावेळी या इफ्तार पार्टीचे भव्य दिव्य नियोजन करण्यात आले होते. मुस्लिम समाज बांधवांचा रोजा उपवास सोडण्यासाठी विविध फळे, स्वादिष्ट बिर्याणी चे जेवण ठेवण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.