धोंडमाळ या ठिकाणी घर फोडी, 10 तोळे सोने गेले चोरीला
धोंडमाळ ता. आंबेगाव या ठिकाणी राहत असलेले विष्णू कान्हुजी आवटे यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याची घरतना घडलेली असून अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे , मिळालेल्या माहिती अनुसार विष्णू कान्हुजी आवटे यांची मुलगी पल्लवी हीचे 22/04/2023 रोजी लग्न असल्या कारणाने घरातील काही लोक हे मुंबई (उल्हानगर) या ठिकाणी लग्नाचा खरेदी कामी गेलेले होते व 2 ते 3 दिवसांनी ते मुंबई वरून परत त्यांच्या राहत्या घरी म्हणजे धोंडमाळ या ठिकाणी आले , विष्णू आवटे यांच्या पत्नी खरेदी मधून उरलेले पैसे ते नेहमी ठेवत असलेल्या जिण्या खालील रूम मधील पेटित ठेवण्यास गेल्या असता त्यांना जीन्या खालचा रूम उघडा दिसला दरवाजाला लावलेले कुलूप ही त्या ठिकाणी मिळाले नाही , त्या नंतर ते त्या रूम मधील पेटी जवळ जाऊन त्यांना ती पेटी उघडुन पाहिले तर त्यातील दागिने ठेवलेले सर्व बॉक्स त्यांना उघडे आणि त्यातून सर्व दागिने काढून घेतलेले दिसले व त्यांनी हा सर्व प्रकाराची चौकशी त्यांचे पतीला म्हणजेच विष्णू कान्हुजी आवटे यांना आणि घरातल्या सर्वांना विचारणा केली असता त्या सर्वांनी आम्हाला या प्रकाराबद्दल काही एक माहीत नसल्यालचे सांगितले , आवटे हे बाहेर जात असताना नेहमी मागील दरवाजा जवळील किटली मध्ये चावी ठेऊन बाहेर जात येत होते, त्या वेळी कोणीतरी अज्ञात वक्ती ने घरात कोणीही नसताना येऊन घरा जवळील ठेवलेल्या चवीने किंवा डूब्लिकेट चवीने घर उघडून घरात प्रवेश करून जिन्या खालील रूम चे कुलूप कष्याच्या तरी सहाय्याने तोडून सदर रूम मधील पेटीतील सोन्याचे दागिने चोरी करून नेले , पेटी मध्ये 60,000 किमतीचे दीड तोळे वजनाचे नेकलेस , 40,000 किमतीचे एक तोळे वजनाची सोन्याची चैन, 1,35,000 किमतीचे तीन तोळे तीन ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र , 1,35,000 किमतीचे तीन तोळे तीन ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र
असे एकूण - 3,70,000 सोन्याचे दागिने चोरी झालेले असून त्या अज्ञात चोरट्या विरोधात घोडेगाव पोलीस स्टेशनचे मध्ये तक्रार दाखल केलेली असून पोलीस या विषयी अजून तपास करत आहेत.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
धोंडमाळ