Type Here to Get Search Results !

एच आय व्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा वधू वर परिचय मेळावा आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेर व शिव अस्तित्व फाउंडेशन यांच्यावतीने



आधार बहुउद्देशीय संस्था अंमळनेर व शिव अस्तित्व फाउंडेशन यांच्यावतीने एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा वधू वर परिचय मेळावा संपन्न.




जळगाव प्रतिनिधी-आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर व शिव अस्तित्व सेवा फाउंडेशन यांच्यावतीने आज जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या अल्पबचत भवन येथे एच आय व्ही सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 101 व्यक्तीने आपला परिचय दिला. यावेळी दहा एचआयव्ही सहज जीवन जगणाऱ्या व्यक्तींचा विवाह ठरला आहे.




जळगाव येथील अल्पबचत भवन मध्ये घेण्यात आलेल्या वधु वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन सहज फाउंडेशन अध्यक्ष सरिता माळी कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले , एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या वधू वर मेळाव्यासाठी गुजरात ,अहमदाबाद ,सुरत, नाशिक ,धुळे ,औरंगाबाद,पुणे, मुंबई ,अकोला ,परभणी ,धाराशीव, नांदेड, वाशिम ,अशा विविध जिल्ह्यातून या कार्यक्रमासाठी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्तीनी आपला सहभाग नोंदवला व आपला परिचय दिला.




या कार्यक्रमासाठी आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष डॉ भारती पाटील , शिव अस्तित्व सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष सविता साठे, महिला बालकल्याण समिती सदस्या देवयानी गोविंदवार, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा चांडक, जिल्हा एड्स नियंत्रक कार्यक्रम अधिकारी संजय पहूरकर, बालकल्याण समिती सदस्य संदीप पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते


या वधू वर मेळाव्या प्रसंगी एचआयव्ही सहज जीवन जगणाऱ्या दहा व्यक्तींचा विवाह ठरला आहे.




हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आधार बहुउद्देशीय संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी विहान काळजी व आधार केंद्राचे बाह्य संपर्क अधिकारी व पदाधिकारी शिव अस्तित्व सेवा फाउंडेशनचे सदस्य व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad