पूरातन गुफेचे संवर्धन करण्याची प्रदीप वाघ यांची मागणी.
मोखाडा प्रतिनिधी - सौरभ कामडी
मोखाडा - निसर्गातील अनेक गोष्टी आपल्या मानवी जीवनात आपण बघत आलो आहोत. निसर्ग म्हटल्यावर आपल्याला या निसर्गाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटतात त्या गोष्टी मधून काही गोष्टी अश्या असतात की आपले मन रमुन जात असते. त्या ठिकाणी आपण आवरजून जात असतो. ते म्हणजेच काही गुफेचे ठिकाण राहते. गुफा ही निसर्गामध्ये विविध ठिकाणी आढळून येते काही गड किल्ल्यांवर तर काही डोंगराळ भागात त्याचे मनोरंजन करण्यासाठी लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात आणि त्याचा लाभ घेत असतात आणि आनंद सुद्धा घेत असतात. म्हणून त्यासाठी त्या भागातील जे पण पर्यटन असते तिथे जाण्यासाठी योग्य तो मार्ग असणे खूप गरजेचे असते म्हणून त्यासाठी त्या ठिकाणची नागरिक हे चांगल्या पद्धतीने मार्ग कसा होईल याचे प्रयत्न करत असतात, की योग्य तो मार्ग मोकळा करावा आणि जे पण तेथील स्थळ आहे ते बघण्या योग्य आणि सुरळीत पणे व्हावे यासाठी प्रयत्न राहतात. अश्याच प्रकारे
मोखाडा तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत मधील डोंगर व निसर्गाच्या कुशीत असलेल्या राकस गडदीचे संवर्धन करण्याची गरज असुन गुफेस डागडुजी करून पर्यटन स्थळ विकसित केले पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले असुन तशी मागणी शासनाकडे पत्र देऊन केली आहे.