घोडेगाव भीमाशंकर रोड वर अपघात , एकाचा जागीच मृत्यू
शिनोलो ता. आंबेगाव 30/03/2023 रोजी सकाळी 9 च्या सुमारास शिनोली जवळील बोगदेवाडी फाटा येथे पिकप आणि दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला या मध्ये एका चा जागीच मृत्यू झाला व दोन जण जखमी आहेत , मिळालेल्या माहिती वरून ओंकार उमेश सुमंत , सागर संतोष उगले व नईम यासिद नदाफ हे भीमाशंकर वरून घोडेगाव च्या दिशेने येत असताना ओंकार उमेश सुमंत हा खूप बेजबाबदार पणे त्याच्या जवळील स्प्लेंडर गाडी नं . MH27BU5299 ही चालवत होता, शीनोली हद्दीतील बोगदेवडी फाटा (बोडकीजवळ) एका छोटा हत्तीस ओवरटेक करत असताना स्वतःच्या गाडीवरील ताबा सुटून ते पिकप नं. MH14HU8842 या पिकप च्या मागील हौद्यास ठोकून मोठा अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये ओंकार उमेश सुमंत वय 20 रा. शनिवार पेठ सातारा याचा जागीच मृत्यू झालेला आहे व त्याच्या माघे बसलेले सागर संतोष उगले रा. काळजंबा वाशिम व नईक यासिद नदाफ रा. कोथळी ता.शिरोळ जि.कोल्हापूर हे जखमी असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविले आहे , व या संबंधी घोडेगाव पोलीस स्टशनमध्ये गु.र.नंबर 132/2023 भादवी कलम 279,337,338,304 (अ),427 मोटार वाहन कायदा कलम 184,128/177 गुन्हा नोंद करण्यात आला व घोडेगाव पोलीस स्टशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
शीनोलो