आमलाड त्रिमूर्ती महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
तळोदा येथील विद्या सहयोग बहुउद्देशीय संस्था संचलित त्रिमूर्ती महिला महाविद्यालय आमलाड येथे दिं 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आरजू पिंजारी होत्या तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापिका रामेश्वरी बत्तीसे उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी इतिहासात अजरामर झालेल्या महिलांविषयी आपले मनोगत व्यक्त केले. प्राध्यापिका रामेश्वरी बत्तीसे यांनी महिला दिनानिमित्त 8 मार्च या दिवशी महिला दिन का साजरा केला जातो याविषयी सविस्तर माहिती सांगितली तसेच चेतना माळी यांनी महिला दिनाचे औचित्य साधून आजच्या काळात महिला सबलीकरणाचे महत्त्व पटवून दिले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. आरजू पिंजारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या सर्व ऐतिहासिक स्त्रियांविषयी सखोल माहिती दिली.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टी वाय बी ए ची विद्यार्थिनी कुमारी दीपिका विनोद डुमकुल हिने केले तर आभार प्रदर्शन एसवायबीए ची विद्यार्थिनी निकिता मराठे हिने केले. कार्यक्रमाची सांगता विद्यापीठ गीताने करण्यात आली.