पोलिसात दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून राहते घर पेटून दिले
पिंगळवडी ता.आंबेगाव या ठिकाणी दि.25/03/2023 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास दिलीप तुळशीराम यांचे राहते घर पेटून धील्याची घटना घडलेली आहे , मिळालेल्या माहिती नुसार आरोपी सागर पांडुरंग वाघ वय 29 राहणार पिंगलवडी याणी दिलीप तुळशीराम यांच्या पत्नीचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला होता व त्या मुळे दिलीप तुळशीराम आणि त्यांच्या पत्नीने सागर पांडुरंग वाघ यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली
या तक्रारीचा राग मनात धरून आरोपी सागर पांडुरंग वाघ याणी दिलीप तुळशीराम यांस शिवीगाळ करत आणि मार हान करत त्याच्या जवळील आपपेटीच्या सहाय्याने कुणाचं व गवताचं छप्पर असलेले राहते घर पेटून दिल्याने संपूर्ण घर व घरातील सर्व साहित्य व 8 हजार रोख रक्कम जलून खाक होऊन अंदाजे 50 हजार रुपयांचे नुकसान केलेले आहे आरोपीला माहिती मिळताच घोडेगाव पोलिसांनी अटक केलेले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली ओपो पोलीस निरीक्षक निखिल मगदूम हे पुढील तपास करत आहेत .
प्रतिनिधी - आकाश भालेराव
घोडेगाव