महिला दिन सप्ताहानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर
जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त लुपिन फाऊंडेशन चा माध्यमातून तळोदा पियू अंतर्गत BCI प्रकल्पातील खरवड या गावात महीला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
लुपिन ह्यूमन फाऊंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक निलेश पवार, प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाणे, जिल्हा प्रकल्प समन्वयक दिपक जाधव, चंदन टोकसा, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील कार्यक्रम हा जिल्हा प्रकल्प समन्वयक दिपक जाधव व खापर पि.यू चे पि.यू. व्यवस्थापक प्रदिप पिंपळे यांचा मार्गदर्शनाखाली व तळोदा पियू माजी पियू व्यवस्थापक अभंग जाधव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरूवात आलेले मान्यवरांचे , महिलांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली. व अभंग जाधव यांनी जागतिक महीला दिनाचे महत्त्व सांगून माहिती दिली. व आरोग्य तपासणीसाठी डॉ. संजय चव्हाण लाभले. सदर कार्यक्रमास 100 महीलांची उपस्थिती होती यातील 62 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. व संबंधित औषधी देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी BCI प्रकल्पाचे सगळे कृषी मित्रांनी परिश्रम घेतले सरपंच प्रमिला आत्माराम पाडवी व उपसरपंच यांचे सहकार्य लाभले