प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात एका पिढीत मुलीचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करा
वारंवार प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात एका पिढीत मुलीचा फोटो व्हायरल केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवती सेनेच्या जिल्हा युवती अधिकारी पूजा खंदारे यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात केली आहे.
बार्शी तालुक्यात अनुसूचित जमातीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्यावर जीवघेणाअल्ला झाला होता. याबाबत खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून गृहमंत्र्यांकडे अत्याचार पिढीतील न्याय देण्याची मागणी केली होती. अल्पवयीन पीडित अनुसूचित जमातीतील असल्याने गुन्हेगारांना पाठीशी घातले जात आहे का असा सवाल करण्यात आला होता. यावर प्रसिद्धीसाठी अत्याचार पीडित मुलीची स्त्री म्हणून बाजू घेण्याऐवजी तिचे जखमी अवस्थेतील फोटो ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत. खासदार संजय राऊत यांच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे तोच गुन्हा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यावर दाखल करावा. चित्रा वाघ यांनी केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या पक्षाची बाजू घेऊन फोटो प्रसिद्ध केला आहे असे खंदारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.