मोहोळ | देवडी येथील दोन शेतकऱ्यांची १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या गाईंची चोरी
देवडी (तालुका मोहोळ) येथील दोघा शेतकऱ्यांच्या एक लाख ७० हजार रुपये किमतीच्या तीन गाई अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची फिर्याद मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे. मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवडी तालुका मोहोळ येथील शेतकरी आकाश भारत थोरात यांच्या शेतातील जर्सी गाईच्या गोठ्यामध्ये सात गाय बांधलेल्या होत्या. ते रात्री जेवण करून झोपी गेले त्यांना रात्री दोन वाजता जाग आली आणि त्यांनी गोठ्यात पाहीले असता, सात गायीपैकी दोन गाई त्यांना दिसून आल्या नाहीत. त्याचबरोबर त्यांचे चुलत बंधू रोहीत अशोक थोरात यांच्या गोठ्यातील सहा गायी पैकी एक जर्सी गाय देखील दिसुन आली नाही या तीन्ही जर्सी गायी, एक गाय किंमत अंदाजे ६० हजार अशा एकुण एक लाख ७० हजार किमतीच्या अज्ञात चोरटयांनी पहाटेच्या सुमारास गाई चोरून नेल्याची फिर्याद मोहोळ पोलीसात दाखल करण्यात आली आहे.