Type Here to Get Search Results !

बंदी भागातील महिलांना ऊमेद अभियाना मार्फत मिळाला रोजगार



बंदी भागातील महिलांना ऊमेद अभियाना मार्फत मिळाला रोजगार

प्रतिनिधी:- संजय जाधव उमरखेड




तालुक्यातील बंदी भाग म्हणून व यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात शेवटचा टोक म्हणून ओळख असलेल्या बंदी भागातील महिलांना उमेद अभियानांतर्गत आज दि. 23-03-2023 रोजी सोनदाभी येथे मानव विकास मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या वन उपज विक्री व प्रक्रिया केंद्रा फलक अनावरण करण्यात आले.




या केंद्राच्या माध्यमातून निर्माण होणारे विविध व्यवसायाचे मारदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. निरज नखाते सरानी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती भाऊ पिलंवंड यांनी तर वन उपज प्रक्रिया उद्योगाची रूपरेषा कशी असेल याची सविस्तर माहिती मा. पुरी सर यांनी दिली. सदर प्रकल्पच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी होईल आणी त्यातून महिला सक्षम कश्या प्रकारे होतील याची बद्दल मा. इटकरे सरानी माहिती देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.




तर सूत्रसंचालन तरवरे सर यांनी केले. या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाचे इटकरे सर, वाढवे सर, तरवरे सर, कानिदे सर, मोरे सर,धम्मपाल इंगोले सर तसेच दराटी प्रभागातील 16 गावातील सरपंच, प्रतिष्टीत व्यक्त, ग्रामसंघांचे पदाधिकारी, कॅडर व महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad