गांजा तस्करी प्रकरणी फरार आरोपी अखेर अटक
गांजा तस्कर प्रकरणी सतरा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस रायगड पोलिसांनी पारगाव पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. पारगाव पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे रायगड पोलीसांनी पारगाव पोलीस ठाणे स्टाफचे कौतुक केले आहे.
गांजा तस्करी प्रकरणी 17 वर्षा पासून फरार असलेल्या आरोपी गणेश उत्तम चव्हाण (वय 45 मुळ रा. जांभोरा औरंगाबाद) हा आंबेगाव तालुक्यातील पारगाव शिंगवे पोलीस ठाण्याच्या हद्दीत भराडी येथे राहत असल्याची माहिती रायगड पोलिसांनी पारगाव पोलिसांना कळवली होती. याबाबत रायगड पोलीस पारगाव पोलीस ठाणे येथे आले होते. पारगाव पोलीस स्टाफ व रायगड पोलीस स्टाफ यांनी दिनांक 16/3/2023 रोजी सदर आरोपी राहत असलेल्या ठिकाणी त्यास अटक करण्यास गेले असता आरोपी घटनास्थळावरुन पळून जात असताना पोलिसांनी 200 मीटर पळून आरोपीस ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हा घर बांधकाम करण्याचे काम करत असून तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. पारगाव कारखाना पोलीस स्टेशन हद्दीत तीन ते चार दिवसापूर्वी घर बांधकाम करण्यासाठी तो आला होता. सदर आरोपीस रायगड पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे. पारगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रायगड येथील कर्जत विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री लागरे यांनी पारगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांना संपर्क करुन त्यांचे व त्यांच्या स्टाफचे कौतुक केले आहे.
प्रतिनिधी - आकाश भालेराव
पारगाव