मोलगीत गुढीपाडव्याच्या निमित्ताने भूमीसुपोषण कार्यक्रम
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे या वर्षीही गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भूमीसुपोषण कार्यक्रम मोलगी परिसर सेवा समितीच्या माध्यमातून घेण्यात आला.शेतकऱ्यांना आपल्या शेतीची,मातीची,नैसर्गिक संसाधनांची,पुढील नैसर्गिक संकटाची जाण शेतकऱ्यांना करून देणे व निसर्ग देवतेची पूजा करून आपली शेती आणि आरोग्यासाठी आराधना करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर मोलगीच्या ओलीदोपाडा व ओलमीटेम्बा पाडा येथे नवीन वर्षांत शेतकऱ्यांच्या घरातील सुख समृद्धीसाठी व नवीन वर्षातील सुरवात चांगली होऊन खरिप हंगामातील शेतीसाठी भूमीसुपोषण कार्यक्रम मोलगी येथील शेतकरी गटांकडून घेण्यात आला.
आजचे मानवी जीवन आणि पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टी ही जंगल,पाणी,जमीन,हवा या गोष्टींवर अवलंबून असून आज प्रंचड मोठया प्रमाणात जंगल तोड झाल्याने पाणी कमी झाले उष्णतेच्या प्रमाणात दर दरवर्षी पाच डिग्रीने भर पडत असून दर वर्षी वाढणाऱ्या लोकसंख्येला या गोष्टी कमी पडत आहे.आणि मानवी जीवन जगणे कठीण होत आहे पुढील काळात ही परिस्थिती याहून भयानक होणार आहे.याचा अंदाज आज येतो आहे.
शेतकरी आपल्या शेतीतीत अधिक उत्पन्नाच्या लालसेने खूप मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करत असल्याने जामीनितील पोषक घटक पूर्ण पणे नाहीसे झाले आहेत बिना खताचे आता शेतीतील उत्पन्न शक्य नाही.अशा परिस्थितीत जमिनीतील पोषक घटक निर्मितीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.म्हणून मागील दोन वर्षा पासून मोलगी परिसर सेवा समितीने आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसोबत जमीनीची/मृदा संरक्षणासाठी गुढीपाडव्याला भूमी सुपोषण हा जागरणाचा विषय घेत आहे.
गुढीपाडव्याला गांवातील शेतकरी गट एकत्र येतात व नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वर्षी खरीप हंगामातील नियोजनावर चर्चा होते.आणि शेतकऱ्यांची पूर्ण शेती ज्यांच्या वर अवलंबून आहे त्या औजाराचे म्हणजे नांगराची व प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतील आणलेली माती एकत्र करून त्यावर कलश ठेऊन पूजा करण्यात येते.
या कार्यक्रमास पूजाविधी करतांना पुजारी हुण्या बाबा,आहेत,शेतकरी गटाचे अध्यक्ष दामा वसावे,सचिव रातीलाल वसावे,रविंद्र वसावे,गुलाबसिंग वसावे,दशरथ वसावे,रामसिंग वसावे,संदीप वळवी,दाजला वसावे,दित्या वसावे,हात्या वसावे,सोत्या वसावे,पाचा वसावे,आदि उपस्थित होते.त्याच प्रमाणे मोलगी परिसर सेवा समितीचे मनोहर पाडवी,आपसिंग वसावे,संकेत वळवी,ओल्या पाडवी,दमण्या पाडवी,नटवर वसावे आदी उपस्थित होते.
यावेळी जमीन सुपोषणाचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगण्या आले व त्या वरील उपाययोजना कशा कराव्यात यावरही मार्गदर्शन करण्यात आले.शेवटी धरती मातेचे,कुलदेवतेचे,भारत मातेचे वंदन आणि जय घोष करून कार्यक्रम संपन्न झाला.
ही पूजाविधी नवीन वर्षांतील शेतकऱ्यांच्या घरातील सुख समृद्धी साठी व नवीन वर्षातील खरिप हंगामातील शेतीसाठी केली जाते शेतीतील उत्पन्न चांगले यावे, पाऊस चांगला पडावा,यासाठी या दिवशी शेतीत पाच वेळेस नांगर फिरवून शेत नांगरले जाते.ही अनेक वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे.