Type Here to Get Search Results !

सोलापूर | पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा युवक काँग्रेस कडून दहन



पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा युवक काँग्रेस कडून दहन 


मोदी नांवावर वक्तव्य केल्याबद्दल मोदी सरकारच्या दबावामुळे राहुल गांधी यांना सूरत कोर्टाने दोन वर्षाची शिक्षा केली. याविरोधात सोलापुर शहर युवक कांग्रेसच्या वतीने प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदशनाखाली अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दहन केला. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. या आंदोलनात युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad