Type Here to Get Search Results !

जयसागर धरण येथे नवीन पंप व मुख्यजलवाहिनी काम होण्यासाठी कुणाल उदावंत यांचे पालकमंत्र्यांना साकडे.



जयसागर धरण येथे नवीन पंप व मुख्यजलवाहिनी काम होण्यासाठी कुणाल उदावंत यांचे पालकमंत्र्यांना साकडे.


जव्हार - दिनेश आंबेकर 


(पालघर जिल्हा पालक मंत्री रवींद्र चव्हाण): जव्हार शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या सन १९९८ व सन २००० साली नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग येथे पंपगृहात पूर्वीच्या ४० एच. पी. मोटरपंपच्या ऐवजी ६० एच. पी. चे पंपिंग मशिनरी बसविणेत आल्या होत्या. परंतु हे पंप मशिनरीज बसविल्यापासुन आज पावेतो जव्हार शहरातील घरे व वस्त्या ह्यात बरीच वाढ झालेली आहे व पाण्याची ही मागणी वाढलेली आहे.त्यामुळे येथील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होत नसल्याने भाजपा जव्हार तालुका अध्यक्ष कुणाल यांनी पालघर जिल्हा पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे जय सागर जलाशय येथे नवीन पंप व मुख्य जलवाहिनी यांचे काम होण्यासाठी साकडे घातले आहे.




सन २००१ साली जव्हार नगरपरिषदेची नळ जोडण्याची संख्या १,४५० इतकी होती. तर आज रोजी जव्हार नगरपरिषदेची वाढती लोकसंख्या पाहता नळजोडण्या २,५१० इतक्या झालेल्या आहेत. सद्यस्थितीत शहरास पाणी पुरवठा पुरेश्या प्रमाणात होत नाही, शहरात पुरवठा करणेसाठी जयसागर धरण येथे ६० एच. पी. चे दोन पंप बसविलेले आहेत, त्यापैकी एक वेळेस एक पंप कार्यरत असतो.

परंतु दैनंदिन जव्हार शहराची पाण्याची वाढती मागणी पाहता जयसागर धरणावरील बसवलेले पंपाद्वारे उपसा केलेले पाणी हे शहरात पाणी पुरवठा करण्यास अपूर्ण पडत आहे. त्यामुळे शहरातील उंच जलकुंभही पुरेशा प्रमाणात भरत नाहीत व शहरास विविध ठिकाणी कमी दाबाने व अपूर्ण स्वरुपात पाणी पुरवठा होत असतो, तसेच ह्या कारणास्तव नगरपरिषदेस शहरातील नागरीकाचे वारंवार मोर्चे, निवेदन व तक्रारी प्राप्त होत आहेत.यावर उपाय म्हणजे जयसागर धरण ते जव्हार जलशुध्दीकरण केंद्र पर्यंत मुख्य जलवाहिनी हीशुध्द लोखंडी टाकणे व जयसागर धरण येथील पंपगृहावर १०० एच. पी. क्षमतेचे दोन मोटर पंपसेट बसविणे हाच एक पर्याय आहे. खडखड धरणाहून जव्हार शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत पाणी पुरवठा योजना उभारणे हे कामे सद्यस्थितित प्रगतिपथात आहे.या योजनेंतर्गत खडखड धरणाहून जव्हार जलशुध्दीकरण केंद्र पर्यंत पाणी उपसा करुन नवीन वितरण व्यवस्थेमार्फ़त शहरात पाणी पुरवठा करणे असे कामे विविध उपांगानुसार अंतर्भूत आहेत. या योजनेचे पाणी हे पाटबंधारे विभागाच्या खडखड धरणातून मिळणार आहे. त्यानुसार हे पाणी वापराचे देयकाचा अतिरीक्त बोजा नगरपरिषदेवर पडणार आहे.

नगरपरिषद मालकीच्या जयसागर धरण येथून १०० एच. पी. क्षमतेचे दोन मोटरपंप बसविल्यास सदरील नगरपरिषदेच्या आर्थिक बचत होण्यास मदत होईल अश्या आशयाचे निवेदन उदावंत यांनी शहराच्या नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी पालक मंत्री चव्हाण यांना दिले असून त्यांनी सकारात्मकता दाखवली असल्याचे उदावंत यांनी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News