मुदखेड तालुक्यातील मुगट शिवार येथे इशार पेट्रोल पंप जवळ वळण रस्त्यावर नांदेडहून मुदखेड कडे जाणारा मालवाहू ट्रक व मुदखेड वरून नांदेड कडे जाणारा ऑटो यांच्या समोरासमोर धडक यात ऑटो मधील चार जणांचा मृत्यू झाला यात काही जणांना विष्णुपुरी येथील शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले हा भीषण अपघात दिनांक 30 मार्च रोजी सकाळी दहा वाजता घडला
मुदखेड तालुक्यातील मागील पाच महिन्यापूर्वी असाच एक्सीडेंट झाला त्यात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर आज दिनांक 30 मार्च 2023 रोजी प्रवाशांवर काळाने घात घातला या त चार जणांचा मृत्यू झाला अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे सरोजा रमेश भाई, (वय 40) राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा गाली कल्याण भोई (वय 24 ) रा. गेवराई जिल्हा बीड जोयल कल्याण भोई रा. गेवराई जिल्हा बीड पुंडलिक किशनराव पोलाटकर या. सावरगाव माळ तालुका भोकर(वय 70) यांचा समावेश आहे