Type Here to Get Search Results !

तळेगाव-दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था येथे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन



ग्रामपंचायतींनी शासकीय निधीवर अवलंबुन न राहता विविध मार्गांनी स्व-निधी उभा करुन गावाचा विकास साध्य करावा यासाठी राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे vयांचे मार्फत दि.०९/१०/२०२३ आणि १०/०३/२०२३ रोजी तळेगाव-दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था येथे दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यशाळेचे भांगरापाणी ता.अक्कलकुवा येथील  लोकनियुक्त सरपंच सोन्या टेंबर्‍या वसावे यांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद् घाटन करण्यात आले. प्रसंगी आदर्श गांव भगदरीचे लोकनियुक्त सरपंच पिरेसिंग भीमसिंग पाडवी,पिंपळखुट्याच्या सरपंच सौ.रंजना अशोक राऊत,यशदाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सत्र संचालक श्रीमती संध्या जगताप,सत्र समन्वयक डाॅ.ज्ञानेश्वर पाटील,समाज सेवी अर्चना मोरे ग्रामविकास अधिकारी नरोत्तम बिर्‍हाडे, भटेसिंग गिरासे,बाळु पाटील यांच्यासह ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी लोकनियुक्त सरपंचसह मान्यवर उपस्थित होते.


 कार्यशाळेत "आसरा" सोशल फाउंडेशनच्या श्रीमती अर्चना मोरे यांनी घरोघरी शून्य कचरा निर्मीती द्वारे खर्चात बचत करुन,उत्पन्नात वाढ व घनकचरा व्यवस्थापन नियोजन व अंमल बजावणी करुन ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करण्या विषयी सुरेख मार्गदर्शन केले.पालघरचे सेवानिवृत्त गट विकास अधिकारी एन.टी.देसले यांनी भारतीय राज्य घटनेतील तरतुदी ,७३ वी घटना , महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील ग्रामपंचायत उत्पन वाढीच्या बाबतीत महत्वाच्या तरतुदींविषयी विवेचन केले. ग्रामपंचायत अधिनियमांचे गाढे अभ्यासक व्याखाते श्री.विक्रम खोपडे,कोल्हापुर यांनी ग्रामपंचायत संगणकीकरण,डिजीटल प्रणालीद्वारे कर वसुली, शासकिय योजनेमध्ये ग्रामस्थांचा सहभाग तसेच ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ विषयी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. राजगुरु नगरचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी कुंडलीक नेहेरे यांनी सरपंच कसा असावा आणि त्याची कर्तव्ये काय? ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मंगल कार्यालय,व्यापारी गाळे बांधणे.मोबाईल टाॅवर तसेच वीज मंडळाचे टाॅवरवर कर आकारणी करणे,दाळ प्रक्रिया,आमचुर उद्योग,बांबु प्रकल्प,चारोळी,डिंक,टोळंबीसारख्या वनोत्पादन प्रक्रिया उद्योग सुरु करणे तसेच C.S.R.फंड (उद्योग जगताची सामाजिक जबाबदारी) याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी नंदुरबार जिल्हातील ५ हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या  ३३ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती त्यात  अक्कलकुवा तालुक्यातुन ग्रामपंचायत अक्कलकुवा,भगदरी,भांगरापाणी,मोलगी,मोगरा,पिंपळखुटा,वडफळी,डाब,खापर,सिंदुरी,उमरागव्हाण मोरंबा, आणि धडगाव तालुक्यातुन तोरणमाळ,मांडवी,राजबर्डी,रोषमाळ खु.,कात्री,बिजरी,चिखली,गेंदा शहादा तालुक्यातुन म्हसावद,प्रकाशे,मंदाणे,मोहिदे त.श.,कन्साई,नंदुरबार तालुक्यातुन धानोरा,रनाळे,तलवाडे खु.,नवापुर तालुक्यातुन विसरवाडी,खांडबारा,हळदाणी,चिंचपाडा तर तळोदा तालुक्यातुन बोरद ग्रामपंचायतीची निवड झाली होती. या कार्यशाळेसाठी भांगरापाणीचे ग्रामविकास अधिकारी नरोत्तम बिर्‍हाडे,भगदरीचे संतोष शिंदे,माधवराव धनगर,किसन पावरा,जान्या पाडवी,भाऊराव बिरारे,राजेश ब्राम्हणे,डी.डी.पाटील,हिंमतराव वंजारी , आतिश चव्हाण,कैलास सोनवणे ,एस.एस.बावा,योगेश पाटील,विजय सैंदाणे,शरद पाटील,विजय पाटील,दिनेश पाटील,दिलीप पाटील,भटु पाटील,कैलास सोनवणे ,पंकज सोनवणे,मनोज पावरा,प्रशांत चव्हाण,श्रीमती ज्योती पराडके तर डाबचे सरपंच आकाश धनसिंग वसावे,मोलगीच्या सरपंच सौ.ज्योती तडवी,बोरदच्या सरपंच अनिता भिलाव,वडफळीचे सरपंच दिलीप राऊत,उमरागव्हाणचे सरपंच अविनाश वसावे,कात्रीचे सरपंच संदिप वळवी हिना पावरा,निमा पाडवी,तेलसिंग पावरा,रिता पटले,मंदाणेचे सरपंच शरद साळुंखे तर कन्साईचे सरपंच सविता पावरा सहभागी झाले होते 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad