भारतीय जनता पाटीॅ मोखाडा तालुका बूथ सशक्तीकरण अभियान प्रशिक्षण वर्ग
प्रतिनिधी :सौरभ कामडी
प्रगती प्रतिष्ठान मोखाडा येथे विस्तारक योजने अंतर्गत बूथ सशक्तीकरण अभियान विषयासंबंधीच्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
मोखाडा मंडळाचे सरचिटणीस श्री. विलास पाटील यांनी वर्गाचे प्रास्ताविक आणि संघटनात्मक नियोजन तर मोखाडा तालुका प्रभारी मा.सौ. सूरेखाताई थेतले मॅडम यांनी उपस्थितांना बूथ सशक्तीकरण करून संघटनात्मक रचना बळकट करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीबद्दल उपयुक्त मार्गदर्शन केले.
यावेळी मोखाडा तालुकाध्यक्ष श्री.विठ्ठल पाटील, माजी जि.प.सदस्य श्री. दिलीप गाटे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. प्रतिक पाघारे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष श्री.किशोर भवारी, तालुका उपाध्यक्ष श्री. देविदास निसाळ, नगरसेवक श्री. जनार्दन गभाले, शहराध्यक्ष श्री. शुभम डिंगोरे, सोशल मीडिया प्रमुख श्री. दिशांत पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. गणेश पाटील, कोषाध्यक्ष श्री. भरत नडगे, चिटणीस श्री. हर्षल बात्रे, महिला मोर्चा सरचिटणीस सौ. शितल ताई घाणे व बूथप्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख उपस्थित.