वैश्विक वर्धापन दिनी आरोग्य शिबिराचे आयोजन
प्रतिनिधी:- -संजय जाधव
मुळावा - वैश्विक विकास संस्था मुळावा हि संस्था मागील 21 वर्षांपासून शैक्षणिक , सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. 26 फेब्रुवारी वैश्विक विकास संस्थेचा 21 वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून दंत रोग तपासणी व पोट विकार तपासणी शिबिराचे आयोजन महाराष्ट्र इंग्लिश स्कुल मुळावा येथे करण्यात आले होते .
सदर कार्यक्रमात उमरखेड येथील डॉ. विठ्ठल मस्के सर्जन आणि डॉ .सुरेखा मस्के दंत चिकित्सक यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत औषधी वाटप करण्यात आली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ . विठ्ठल मस्के , डॉ . सुरेखा मस्के , डॉ . नामदेव महाजन , खरेदी विक्री संघ उमरखेड चे नवनियुक्त संचालक अमृत सूर्यवंशी , सकाळ चे पत्रकार आनंद सुरोशे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैश्विक विकास संस्थेचे अध्यक्ष अजय झरकर यांनी केले . संचालन ईश्वरी भांगे व वेदिका देशमुख हिने केले तर आभार श्रुष्टि पुलाते हिने मानले.