माडळ येथे वाळू माफिया विरोधात धड़क कार्यवाही
अमळनेर/प्रतिनिधि -विशाल मैराळे
माडळ येथे वाळु प्रकरणातुन काही दिवसा पूर्वी एकाचा बळी गेल्यानतर काही दिवस उलटताच पुन्हा वाळु माफियांचा परत अवैधरित्या वाळु तस्करी सुरू झाली असून ते लक्ष्यात घेत ग्रामस्थांनी कठोर भूमिका घेत ट्रॅक्टर पकडुन दिले तलाठी राजेंद्र दाभाडे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे फिर्यादीत नमूद केले आहे की 10 फेब्रुवारी रोजी रात्री तहसीलदारांनी तलाठी राजेंद्र दाभाडे यांना फोनवरून ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पकडल्याची माहिती दिल्याने त्याठिकाणी भेट दिली असता एक निळ्या रंगाचे सोनालिका कंपनीचे विना क्रमांक वाळू भरलेले ट्रॅक्टर आढळून आले तेथे उपस्थित सरपंच, विजय पाटिल. तंटामुक्ती अध्यक्ष, राजेंद्र धनगर. वाळूबंदी अध्यक्ष, सुरेश कोळी. यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सदर ट्रॅक्टर हा ज्ञानेश्वर प्रकाश कोळी, योगेश हिलाल कोळी, व गोकुळ बापू शिरसाठ असून यांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता पाझरा नदी पात्रातून अवैध रित्या बेकायदेशीर वाळू वाहतूक करताना दिसून आल्याने ग्रामस्थांनी ट्रॅक्टर जमा केले यावेळी चालक व मालक फरार झाले सदर ठिकाणी पंचनामा करून ट्रॅक्टर व मुदेमाल मारवड पोलिसात जमा करण्यात आला असून पुढील तपास पो. न. भरत गायकवाड करीत आहेत