Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत क्रांतीज्योती महिला सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांचे पालघर उमरोली माहीम येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप


राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्रामपंचायत क्रांतीज्योती महिला सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांचे पालघर उमरोली माहीम येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप

पालघर जिल्हा प्रतिनिधी :- सुनिल जाबर

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग ,यशदा पुणे प्रस्तावित गोखले एज्युकेशन सोसायटीचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड तालुका डहाणू व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी २०२३ दरम्यान पंचायत समिती पालघर उमरोली माहीम पालघर जिल्हा परिषद संकुल, उमरोली ग्रामपंचायत, माहीम ग्रामपंचायत पालघर तालुका अंतर्गगत क्रांतीज्योती ग्रामपंचायत महिला सदस्य व ग्रामपंचायत पुरुष सदस्य यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले होते..या शिबिरामध्ये उद्घाटनाप्रसंगी पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड प्राचार्य जयराम पाटकर ,पंचायत समिती पालघर गटविकास अधिकारी रेवणकर सर, विस्तार अधिकारी विनोद पाटील सर,अमृत उमतोल सर पेसा समन्वयक,प्रवीण प्रशिक्षक, विजय पाटील, पंजाबराव घ्यारे, नारायण देसले,विजय आंबात,विशाखा वानखेड, अश्विनी घरत ,राहुल ठाकूर सर , ग्रामपंचायत विस्तारअधिकारी सुनील पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती सुरुवात झाली.या त्यानंतर पहिल्या दिवशी विजय पाटील मास्टर ट्रेनर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चा कायदा अधिनियम २०१७ नुसार असलेले विविध कलम यामध्ये सरपंच हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सदस्य असेल तसेच विविध ग्रामपंचायती अंतर्गत असलेले अधिकार सदस्यांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या पेसा कायदा तसेच ग्रामपंचायत अंतर्गत सरपंच उपसरपंच कर्तव्य जबाबदाऱ्या, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ,ग्रामपंचायत जबाबदाऱ्या, महिला सभा,विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विजय आंबात यांनी विकास म्हणजे काय? ग्रामपंचायत कृती आराखडा तसेच विविध पंचवार्षिक योजना अंतर्गत केले जाणारे कामे ७३ वी घटनादुरुस्ती व ग्रामपंचायत स्तरावरील विविध समित्या,त्यांच्या जबाबदाऱ्या,ग्रामपंचायत निधी, आदिवासी भागातील पंचायत इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर नारायण दिसले निवृत्त गटविकास अधिकारी व मनरेगा राज्य समन्वय यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अभिसरण प्रक्रिया तसेच मनरेगा अंतर्गत करावयाची कामे, पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन या मनरेगा अंतर्गत केले जाणारे विविध कामाचे यादी या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अनिल चौधरी प्राचार्य निवृत्ती पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम मधील तरतुदी व विविध कलम मासिक सभा, ग्रामसभा, त्याचबरोबर ग्रामसभेची रचना,सरपंच, उपसरपंच सदस्य आपात्रता, आरक्षण, पेसा कायदा व त्याअंतर्गत करावयाची कामे,अविश्वास ठराव,विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला येणारा निधी ,कर -आकारणी,ग्रामपंचायत ची विविध खाते, या विषयावर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर विविध शासकीय योजना व केंद्र सरकार व राज्य सरकार मार्फत असणाऱ्या विविध योजना याविषयी उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. त्याचबरोबर पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड चे प्राचार्य जयराम पाटकर यांनी शेवटच्या सत्रात विविध खेळांच्या माध्यमातून योजनांचे महत्त्व ,योजनेचे लाभार्थी,व गाव स्तरावर होणारे विविध भांडणतंटे मिटवण्यासाठी विविध उपाय योजना याविषयी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य, कर्मचारी यांचे महत्त्व पटवून सांगितले .या तीन दिवसीय प्रशिक्षणसाठी पालघर, उमरोली. माहीम, जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी पंचायत समिती पालघर राहुल ठाकूर पेसा समनव्ययक यांनी मार्गदर्शन केले, शेवटी उपस्थित प्राचार्य, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला. शेवटी उपस्थित सर्व गोखले एज्युकेशन सोसायटीचे पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड डहाणूचे प्राचार्य जयराम पाटकर, प्रवीण प्रशिक्षक, विजय पाटील, पंजाबराव घ्यारे, नारायण दिसले, विजय आंबात, विशाखा वानखेड, अश्विनी घरत, इत्यादी सहभागी ग्रामपंचायत महिला सरपंच,सदस्या व पुरुष सदस्य प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News