Type Here to Get Search Results !

जून्या चावडीला बाय बाय ई चावडी" सुविधा लवकरच सेवेत एक क्लिकवर कळणार माहिती


जून्या चावडीला बाय बाय ई चावडी" सुविधा लवकरच सेवेत एक क्लिकवर कळणार माहिती

सध्या तीन नमुन्यांचे कामकाज सुरू उर्वरित 18गावनमुने लवकरच अध्यावत प्रक्रिया सुरू

या प्रणाली मुळे महसुली थकबाकी व झालेली वसूली महसूल विभागाला व नागरिकांना देखील एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार*     
                                                                       मुरबाड दि ९ प्रतिनिधी 

 लक्ष्मण पवार 

महसुल खात्यात या पुर्वी आमची चावडी हा उपक्रम राबविला जात होता,पुढची पायरी म्हणून "ई चावडी"सुरू होत आहे,
मुरबाड तालुक्यात हि सुवि़धा सुरू करण्यांत येत या ई चावडी मुळे तलाठ्यांशी संबधीत २१ प्रकारची गावनमुन्यांचे कामकाज असते पैकी तीन प्रकार काम आॅनलाईन झाले असून त्या साठी नागरिकांना या पुढे तलाठी कार्यलयात पाय-या झिजवायची गरज नाही व लवकरच अन्य कामे आॅनलाईन होत असल्याची माहिती कल्याण मुरबाड प्रांतअधिकारी अभिजित भांडे पाटिल यांनी दिली आहे, 
डिजीटल इंडिया लॅड रेकाॅर्ड माॅईनायझेशन हा प्रकल्प सध्या राबविला जात जात आहे, नव्या तंत्रज्ञानाचा वापर ई चावडी हा या सरकरी पोर्टलवर नागरिकांना त्यांना आपल्या मालमत्ता कर किती आला आहे कर बसल्या जागी भरण्याची व हवे ते दस्ताऐवज मिळण्याची सुविधा या ई चावडी प्रकल्पात आहे,मुरबाड तालुक्यातील ८०% ग्रामिण भागात मोडणा-या शेतकरी नागरिकांना पदरमोड करून तालुक्यातील तलाठी चावडीवर हेलपाटे मारावे लागत होते 208महसूल गावे गांवाना 49 तलाठी व 8 मंडळ कार्यालये असूनही वेळेवर सुविधा मिळत नव्हत्या ई चावडी सेवेमुळे महसुली 21 प्रकारची कामे या वर केली जातील ई चावडी मुळे महसुली करभरणा आणी वसूली प्रक्रिया शंभर टक्के आॅनलाईन होत आहेत या 21 प्रकारापैकी तीन प्रकार अध्यावत झाले असून साबारा,फेरफार,आणी खाते उतारा यांची प्रक्रिया सूरू झाली आहे, या पुढे महसुली दस्ताऐवज ते महसुली कर भरणे व नसूली प्रक्रिया या ई चावडी वर होणार असल्याची माहिती प्रांतअधिकारी अभिजित भांडे पाटिल यांनी दिली, कल्याण व मुरबाड तालुक्यातं शहरीकरणामुळे गावनमुने तयार करणे अवघड काम झाले असल्याने हे कान महसूल विभागाकडून सुरू करून गाव नमुने तयार करून ते अपलोड केले जात आहेत त्यांनतर लवकरच हि ई चावडी सेवा आॅनलाईन होईल व यांचा फायदा दुर्गम भागातील शेतकरी नागरिकांना होत तलाठी चावड्यावरील फे-यातुन सुटका होईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News