Type Here to Get Search Results !

कळपातील मेंढरांना कळपाची भिती, मुरबाड करांची अवस्था कोणता " झेंडा" घेऊ हाती



कळपातील मेंढरांना कळपाची भिती, मुरबाड करांची अवस्था  कोणता " झेंडा" घेऊ हाती


    शिवसेनेतील पडलेली उभी फुट, 

तर भाजपातील अंतर्गत लाथाळी,

राष्टवादी /काॅग्रेसची अस्तीत्वाची लढाई , मुलभूत गर्जा पासून वंचित जनजिवन  

त्यातच अंदोलनाचं ब्रम्हस्त्रचं म्यान झालं की काय ?  



मुरबाड दि. २० प्रतिनिधी लक्ष्मण पवार  


मुळात समाज सेवा हि रक्तात असावी लागते,  स्वःतासाठी जगणं फार सोपं असत ,परंतु समाजासाठी जगणं किंवा झटण  फार कठीणं असतं , मग ते राजकारण, असो की समाज कारण, हे सर्वानाच जमतं नसतं  त्या साठी त्याग ही करावा लागतो . असचं गोरगरीबांसाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरून न्यायासाठी झटणारे , गेल्या ३५ वर्षात मुरबाड करांचा  अंदोलनाचा चेहरा म्हणून ओळख असलेले  सुभाषआप्पा घरत यांनी  जिप ,निवडणूकीत अचानक   भाजपाची कास धरली आणी आंदोलनाच ब्रम्हास्त्र म्यान झाल ? . मुलभुत समस्यावर वाचा फोडून गोरगरीबांना न्याया साठीचा सदैव संघर्ष करणारे आप्पा ,आचाट शक्तीचा पुचाट प्रयोग करणा-याच्या विळख्यात गेल्याने ,  कोणता झेंडा घेऊ हाती हि वेळ मुरबाडच्या गोरगरीब जनतेवर येऊन ठेपली आहे.


मुरबाड नव्हे तर ठाणे जिल्ह्यात "ढाण्या वाघ" म्हणून प्रचलित असलेले  सुभाष आप्पा घरत हे गेले ३५ वर्ष तालुक्यातील मुलभूत सुविधा पासून वंचित घटका साठी न्याय देणारं काम करणारे ,एकमेव नेते म्हणावे लागतील , गेल्या ३५ वर्षा पासून ते एक अंदोलनाचा चेहरा म्हणून ओळखले जातात  


. भिषण पाणी टंचाई असो, कि नैसर्गिक अपत्ती असो ,  रस्ते असोत कि आरोग्य समस्या असोत, की लाईटची लोडशेडिग  असो ,  ज्या ज्या वेळेस जनता नाडली जायची त्या त्या वेळेस सुभाषआप्पा  आवाज उठवणारच आणी न्याय पदरात पडत नाही तो पर्यंत कोणाचा ही मुलाहिजा नाही ,गय केली जात नव्हती, परंतु मुरबाड करांना ग्रहण लागलं व सन 2017 ला गेल्या पाच वर्ष झाल  आप्पा भाजपावासी झालं आणं ख-या अर्थान मुरबाडकर आंदोलन व न्याया पासुन पोरक झालं जनतेचा आवाज घुमायचा तो आमसभेला , तालुक्यातील समस्यांची पुरेपुर जान असलेले अभ्यासु व सडेतोड व्यक्तीमत्व मात्र आप्पा भाजपात गेल्याने त्यांची एक प्रकारे कोंडी झाल्या सारखे झालेकी काय असा सवाल नागरिक व्यक्त करतात . मुरबाड करांचा एक सवाल आहे आप्पा ! भाजपात आजच्या घडीला तालुक्यात पाहिल तर आमदार पंचायतराज्यमंत्र्यात विस्तव जात नाही राजकिय सुंदोपसुंदीत या दोन नेत्यांना मुरबाडच्या समस्या व जनतेशी घेण देण नसलं तरी तुम्ही आमचे आहात आमच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी तुमची आहे आणी आपण हि जबाबदारी टाळू नका हि विनती आप्पा आपण गप्प राहिल्याने आजच्या घडीला महिणा भरापासून रात्र रात्र भर लाईट गुल होतो आपण ज्या दिवसी ठरवाल त्या दिवसी तालुक्याच  फार मोठा बदल होत गोरगरीबांना न्याय मिळेल व तेव्हाच वाढलेली बजबजपुरी ला आळा बसेल.

( मुंबई पासून हाकेच्या अंतरावरील मुरबाड तालुका राजकिय अनास्थे पोटी आज तालुका मुलभुत सोईसुविधा पासून वंचित आहे . 22 गावे 46 वाड्यांना भिषण पाणी टंचाई आहे. 64 गावात उघड्यावर अंत्यविधी करावा लागतो. 109 गावांना रस्त्याची वाट पाहावी लागत आहे. शासकीय धान्याचा काळाबाजार बोकाळला असून रोजगारासाठी शेकडो आदिवासी घाटमाथ्याची वाट धरत आहेत. या समस्यांना वाचा फोडणारा ढाण्यावाघ भाजपाने जायबंदी केल्याने तालुक्याची परवड झाल्याचे बोलले जात आहे. 


 

( सर्वचं पक्षात केवल ठेकेदारी वाढली . नेते पुढारी स्वताच्या पोळ्या भाजू लागलेत.माजी पंचायत समिती सदस्य श्याम राऊत. मुरबाड)  


( आमसभा असो की , रस्त्यावरील अंदोलन अन्यायाविरुध्द आवाज उठवणारे आप्पा भाजपात गेले आणि जनतेचा आवाज दाबला गेला . उर्मीला लाटे . समाजसेवीका)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad