केळी लागवड, केळी कापणी, जोरदार भाव यामुळे केळीच मॅन ऑफ द सिरीज
तळोदा तालुक्यातील रांझणी ,प्रतापपूर, चिनोदासह परिसरात केळी कापणी एक महिनाभरापासून जोरात सुरू असून चांगला भाव असल्याने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र आहे. परिसरात केळी लागवड ही जोरात सुरू असून त्यामुळे केळीचाच बोलबाला सुरू असून या हंगामात सध्या तरी केळीच मॅन ऑफ द सिरीज असल्याचे बोलले जात आहे.
दरवर्षी या हंगामात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केळी लागवड करण्यात येत असते, शेतकऱ्यांकडून इतरत्र ठिकाणाहून खोड आणून खोड लागवड करण्यास प्राधान्य दिले जात असून केळी हमखास उत्पन्न देणारे पीक असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान यावर्षी केळीला चांगले हवामान लाभल्याने केळी पिकाची उत्तम प्रकारे वाढवून केळीचे घड ही चांगले बनल्याने चांगला भाव मिळत असल्याचे सांगण्यात येत असून व्यापाऱ्यांकडून चढाओढीने भाव देण्यात येत असुन त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले अर्थाजन होत असल्याने शेतकरी सुखावला असल्याचे चित्र आहे
.परिसरातील शेतकरीकडुन बाहेरून खोड आणून ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतजमिनीवर मशागत करून ठिबक टाकून सरीवर खोडची लागवड करण्यात येत असून त्यांना पाणी देण्यात आहे येत आहे.
21 वर्षापासून ह्या हंगामात केळी लागवड करत असून हमखास उत्पन्न येत असते .यंदा पाणी पातळी चांगली असल्याने उन्हाळ्यात फारसा केळी पिकाला पाण्याचा ताण जाणवणार नसल्याने पीक जोरदार येणार आहे .
योगेशराजे भोसले
शेतकरी, रांझणी