Type Here to Get Search Results !

कोकणातील सर्व शिक्षकांच्या प्रश्नाचा निपटारा एका वर्षात करणार-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन!



कोकणातील सर्व शिक्षकांच्या प्रश्नाचा निपटारा एका वर्षात करणार-आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे प्रतिपादन!


मुरबाड दि. २६ प्रतिनिधी  लक्ष्मण पवार  


कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा नुकताच मुरबाड एमआयडीसी हॉल मध्ये भव्य सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 




 या हॉलमध्ये सत्कार स्वीकारत असताना ज्ञानेश्वर मात्रे यांनी सांगितले की कोकणातील शिक्षकांच्या सर्व प्रश्नांचा एका वर्षात निपटारा करणार त्याचबरोबर जुनी पेन्शन लागू करणार असे प्रतिपादन नवनिर्वाचित कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुरबाड एमआयडीसी हॉलमध्ये काढले.


व्यासपीठावर माजी आमदार दिगंबर विशे.ठाणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषद सदस्य उल्हास भाऊ बांगर, सुभाष (अप्पा)घरत, शिवसेना तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे, भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामभाऊ दळवी, प्रा.धनाजी दळवी, ज्ञानदीप विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर देसले, जिल्हा परिषद शिक्षण समिती निमंत्रित सदस्य भगवान भगत, ज्येष्ठ नेते लियाकत शेख सर, जनसेवा शिक्षण मंडळ सहचिटणीस भास्कर हरड, संचालक पांडुरंग कोर, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, माजी सभापती, माजी उपसभापती उपस्थित होते. 


कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा मुरबाड एमआयडीसी हॉलमध्ये भव्य सत्कार करण्यात आला होता जवळपास मुरबाड तालुक्यातील सर्व शिक्षकांनी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सत्कार केला तसेच व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले की खऱ्या अर्थाने आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा विजय झालाय तो शिक्षकांचा शिक्षकच आमदारच या मतदारसंघाला हवा होता त्या दृष्टीने हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे व निश्चितच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे या कोकण विभागात शिक्षकांच्या अडचणी सोडण्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतील अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी दिल्या.


 तर पुढे बोलताना नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे म्हणाले की माझ्या मतदारसंघातला निधी मी तो फक्त मी शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जाणार आहे यात कोणी गैर मानू नये कारण मागील सहा वर्षात ज्या आमदारांनी या कोकणात नेतृत्व केलं त्यांनी या मतदारसंघाचा निधी फक्त रस्ते ,गटारीसाठी वापरलाय त्यामुळे असं होता कामा नये म्हणून मी माझा निधी प्रथम दर्शी शिक्षण क्षेत्रासाठी वापरण्यात येणार आहे तसेच माझ्या मतदारसंघात मला कोणी एजंट चालणार नाही, प्रत्यक्ष मला येऊन भेटावा मग माझ्याशी हितगुज करावा मला कामाची माहिती द्यावी ते काम शंभर टक्के केला जाणार आहे त्यात कोणती शंका बालगण्याचे कारण नाही, या मतदारसंघात मेडिकल कॉलेज आणण्यासाठी मी जास्त प्रयत्न करणार आहे असे शुभ संकेत यावेळी नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad