Type Here to Get Search Results !

तळोदा येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मार्फत आशा दिवस उत्साहात साजरा



आशा दिवस उत्साहात साजरा



 तळोदा येथे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मार्फत आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमात आशा स्वयंसेविका व गतप्रवर्तक यांचा गुणगौरव सोहळा करण्यात येऊन प्रशस्तीपत्र देण्यात आले.त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, संगीत खुर्ची, गायन हे कार्यक्रम देखील घेण्यात आले .




यावेळी पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे, गटविकास अधिकारी पी पी कोकणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण ,विस्तार अधिकारी एल बी वाघ ,आरोप सहाय्यक दिलीप पाटील ,अशोक पाडवी,तालुका समुह संघटक प्रमोद मराठे, लेखापाल जितेंद्र गांगुर्डे, आरोग्य सेवक देवेंद्र राठोड, कार्यक्रम सहाय्यक सागर बैसाने, दिनेश पावरा, कनिष्ठ सहायक नंदू गिरासे, परिचर श्रीमती कविता अहिरे ,श्रीमती पाटील तसेच मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक उपस्थित होत्या.




    यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण यांनी आशांबद्दल कौतुक करतांना सांगितले की आशा स्वयंसेविका ह्या ग्राम पातळीवर आरोग्यासाठी महत्त्वाच्या दुवा असून संस्थेत प्रसूती, लसीकरण यासाठी त्या नियमित झटत असल्याचे सांगत माता मृत्यू ,बालमृत्यू ,कुपोषण रोखण्यासाठी त्या नेहमी झटत असतात तसेच इतर सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबवताना त्यांची मोलाची साथ लाभत असल्याचे सांगत कोरोना काळातही त्यांनी वाघिणीसारखे काम केल्याचे कौतुक केले.




     यावेळी गटप्रर्वतक मालती पाडवी ,ज्योती जाधव, निमला पाडवी तसेच आशा स्वयंसेविकांनी आपले मनोगत व्यक्त केले .आपल्या मनोगतात तालुका आरोग्य विभागाकडून नेहमीच आशांना प्रेरणा मिळत असल्याचे सांगत केलेल्या कामाबद्दल वेळोवेळी कौतुकाची थाप पडत असल्याने कामाचा उत्साह वाढण्यास मदत होत असल्याचे सांगितले तसेच वेळोवेळी माता मृत्यू, बालमृत्यू ,कुपोषण, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम याविषयी तालुका आरोग्य विभागाकडून नियोजनबद्धरित्या मार्गदर्शन मिळत असल्याने काम करणे सोपे होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले .

कार्यक्रमात वर्षभरात उत्कृष्ट काम करणाऱ्या अशा स्वयंसेविका गटप्रवर्तक यांचा गौरव करण्यात येऊन प्रशस्ती पत्रक वाटप करण्यात आले .त्यानंतर आदिवासी गीतांवर आशा ,गटप्रवर्तकांकडून नृत्य करण्यात आले यावेळी डॉ महेंद्र चव्हाण यांनीही नृत्यावर ठेका धरत आशा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad