Type Here to Get Search Results !

शाळा वाचवा अभियानाला जोरदार सुरुवात शिवराज्य प्रतिष्ठानची दुसरी शिक्षण हक्क परिषद मुरबाड येथे संपन्न


शिवराज्य प्रतिष्ठानची दुसरी शिक्षण हक्क परिषद मुरबाड येथे संपन्न   
  शाळा वाचवा अभियानाला जोरदार सुरुवात
 
मुरबाड दिनांक ७ प्रतिनिधी. लक्ष्मण पवार 
 
 

शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी हाती घेतलेल्या शाळा वाचवा,अभियानांतर्गत दुसरी *ठाणे जिल्हास्तरीय शिक्षण हक्क परिषद* राजमाता जिजाऊ, महाराणी अहिल्यादेवी होळकर,ज्ञानज्योती सावित्रीमाईफुले ,पहिल्या मुख्यध्यापिका फातिमा शेख, माता भिमाई व त्यागमूर्ती रमाई यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून मुरबाड या ऐतिहासिक तालुक्यात नुकताच संपन्न झाली.या शिक्षण हक्क परिषदेचे उदघाटन श्री.गोटीराम भाऊ पवार माजी विधानसभा सदस्य तथा माजी उपाध्यक्ष कोकण विभाग पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेचे स्वागताध्यक्ष श्री. राजेश पवार यांनी प्रथम या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले तर श्री.विक्की कदम, संस्थेचे प्रवक्ते यांनी प्रास्ताविक केले. *शाळा वाचवा अभियान* या उपक्रमाला महाराष्ट्रातून जोरदार सुरुवात झाली असून पहिली शिक्षण हक्क परिषद रत्नागिरी येथे शैक्षणिक धोरणावर आधारित विषय घेऊन संपन्न झाली तर दुसरी शिक्षण हक्क परिषद ठाणे जिल्ह्याचा केंद्रबिंदू म्हणून मुरबाड हा आदिवासी खेड्यापाड्याचा डोंगराळ तालुका असून या भागात शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संघटनेने या शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन करून शिक्षण हा आपला मूलभूत अधिकार आहे व तो आपल्याला टिकवून ठेवण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतील त्या संदर्भात या परिषेदेत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले.
 

प्राथमिक शिक्षण हेच बौद्धिक शिक्षण आहे शिक्षणाचा हक्क कायदा सांगत आहे आणि कायद्याच् उल्लंघन केंद्र व राज्य सरकार करत असेल तर विद्यार्थ्याच्या शिक्षणावर गदा येत असेल तर अन्य शिक्षण फार दूरच आहे त्यामुळे शिक्षण हक्क परिषद संपूर्ण महाराष्ट्रभर होणे गरजेचे आहे असे मत शिवराज्य प्रतिष्ठानचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. रोशन पाटील यांनी यावेळी सांगितले. 
 
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कायदेतज्ञ ऍड.डॉ. सुरेश माने यांनी जागतिक इतिहासाच्या घडामोडी संदर्भात आपले चांगले विचार मांडून शिक्षण क्षेत्राबद्दल देशातील लोक एक मत नसतात तर का नसतात याचे उत्तर त्यांनी देताना सांगितले की कुठलाही समाज कुठलाही देशातील एक समूह एक संघ नसतो तोही विभाजित असतो आणि दुभंगलेला असतो आणि दुभंगलेल्या वर्गामध्ये एक वर्ग सातत्याने आपल्या वर्चस्वाची व अस्तित्वाची लढाई लढत असतो आणि दुसरा वर्ग त्या वर्चस्वाला आव्हान देत असतो असे स्पष्ट मत वीचार मंचावरून मांडले.
 
तर यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार तथा माजी उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ श्री.गोटीरामभाऊ पवार यांनी आपल्या भाषणात सरकारच्या नव्या धोरणाविषयी सांगितले की तुम्ही इमारती बांधा, शाळा बांधा शिक्षक नेमा तुम्ही जे करायचं असेल ते तुम्ही करा, शाळा तुम्ही चालवा, शाळेचा सर्व खर्च तुम्ही करा ,आम्ही फक्त शाळा चालवण्याचे लायसन देऊ असे प्रखर मत मांडून शिक्षणासंदर्भात समाजामध्ये जागृती निर्माण व्हावीया साठी संघटनेस जे सहकार्य लागेल ते समाजाने करावे असे आवाहन त्यांनी विचारपीठावरून बोलताना केले.
  
तर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात निलेश पाटील यांनी शिक्षण देणे ही राज्य सरकार व केंद्र सरकारची मूलभूत व मौलिक जबाबदारी आहे .गाव तिथे शाळा राहिली पाहिजे, टिकली पाहिजे किमान एक विद्यार्थी शाळेत हजर असला तरी त्याला शिक्षण मिळालं पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन करून सभेला हितगुज केले.
  संजय थोरात,एस. एल.पवार,गणेश म्हात्रे,सिद्धार्थ इंगळे,डॉ.रवींद्र जाधव,अशोक गायकवाड,वसंत घावट,मंगेश इसामे,संजय धनगर,गौतम रातांबे,धनाजी दळवी,जयवंत मोगरे,वसंत धनगर,अण्णा साळवे,धनाजी सुरोशे,सिद्धार्थ साळवे,गुरुनाथ पवार,दिनेश जाधव,बुधाजी मुकणे,संजय ईधे,दीपक वाघचौडे,कैलास गायकवाड,विष्णू दिवाणे,अनिल मोरे,नागेश थोरात,राजाराम ढोलम, राजेश चंदने,विजय खोळंबे,स्वाती धनगर, बुधाजी मुकणेआदी मान्यवर उपस्थित होते.हि परिषद यशस्वी करण्यासाठी दि भिमाई को-ऑप क्रेडिट सोसायटी मर्यादित मुरबाड,समता मानव सेवा संस्था यांच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
 तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंदजी रातांबे सर यांनी केले तर शिवराज्य प्रतिष्ठानचे शिवश्री राहुल बिराडे यांनी आभार प्रदर्शन केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad