Type Here to Get Search Results !

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुरबाड शहरात माता रमाई जयंती उत्साहात साजरी


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुरबाड शहरात माता रमाई जयंती उत्साहात साजरी 

नेत्र  व रक्त तपासणी तसेच साडी वाटप करून स्नेहल देसले यांनी जपली सामाजिक बांधिलकी 
 

 
मुरबाड दिनांक ७ प्रतिनिधी लक्ष्मण पवार  
 
सालाबाद प्रमाणे याही वर्षी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुरबाड शहरात शहराध्यक्ष स्नेहल देसले यांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून समाजाप्रती  आपण एक समाजातील प्रमुख घटक म्हणून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने ते उपक्रम राबवत असतात 
 

 यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहामध्ये इंफिगो हॉस्पिटलच्या वतीने नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिर आयोजित करून चष्म्याचा अचूक नंबर मशीन द्वारे काढून तसेच गरीब व गरजू महिलांना माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त साडी चोळीचे वाटप करण्यात आले यावेळी महिलांनी स्नेहल देसले यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या  



  यावेळी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 
 
यावेळी मंचकावर सुनील भगत शिवसेना समन्वयक , रिपब्लिकन  ज्येष्ठ नेते भगवान शेठ देसले, गौतम गवई ,राहुल जाधव,संजय इंगळे, एडवोकेट रजनी अगले जिल्हा महिला उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी , राजू थोरात वंचित नेते, हरीश गुप्ता सम्यक विद्यार्थी अंबरनाथ , अण्णा साळवे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा मुरबाड तालुका अध्यक्ष , राजेश पवार अध्यक्ष भिमाई को-ऑपरेटिव्ह , शंकर गायकवाड किनवली विभाग वंचित आघाडी, विकास वाढविडे, राधाताई लांजेवार, राजेंद्र तुपे, काळूराम भालेराव, राजेंद्र भंडारी, अनिल घरत सर आदी मान्यवर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad