Type Here to Get Search Results !

बहुजन विकास आघाडीच्या मुरबाड विधानसभा अध्यक्षपदी भाऊ मोरे यांची वर्णी


बहुजन विकास आघाडीच्या मुरबाड विधानसभा अध्यक्षपदी भाऊ मोरे यांची वर्णी 
 
 
ठाणे जिल्हाध्यक्ष तुकाराम चौधरी यांच्या उपस्थितीत भाऊ मोरे यांना मुरबाड विधानसभेचे पत्र जाहीर  
 
 दिनांक ७ प्रतिनिधी 
 
 लक्ष्मण पवार 
 
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा लोकप्रिय आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या आदेशाने व ठाणे जिल्हा अध्यक्ष तुकाराम चौधरी यांच्या पुढाकाराने भिवंडी येथे चौधरी यांच्या कार्यालयामध्ये भाऊ मोरे यांना मुरबाड विधानसभा अध्यक्ष पदाचे पत्र देऊन मुरबाड विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली 
 
भाऊ मोरे यांनी लोकक्रांती सामाजिक संघटनेत काम करून जनतेची सेवा केली आहे अनेक सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यामध्ये त्यांनी गोरगरीब जनतेला मायेचा दिलासा दिला आहे त्यांच्या या लोकोपयोगी कामाची दखल घेऊन मुरबाड विधानसभेची जबाबदारी दिल्याचे वरिष्ठांनी सांगितले आहे 
 
यावेळी मोरे यांनी आमच्या पत्रकारांशी बोलताना सांगितलं की बहुजन विकास आघाडीला मुरबाड विधानसभा क्षेत्रात तन मन धनाने वाढवणार असल्याचे तसेच पक्षाला नवसंजीवनी व बळकटी आणून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार व तसेच येणाऱ्या पंचायत समिती पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाचे अधिकृत उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणून तालुक्यात नवचैतन्य घडवल्याशिवाय राहणार नाही असे उद्गार यावेळी त्यांनी बोलताना केले तसेच मुरबाड शहरात पक्षाचे लवकरच मध्यवर्ती कार्यालय व तालुक्यामध्ये गावागावात बहुजन विकास आघाडीच्या शाखा निर्माण करून पक्षाला बळकटी देण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad