तळोदा : एलर्जी, दमा घोरणे क्षयरोग खोकला वारंवार सर्दी होणे शिंका येणे शरीरावर खाज येऊन लाल चट्टे येणे, नाकात खाज येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे, घसा कोरडा पडणे, त्वचेवर चट्टे उमटणे अशा तक्रारी वर्षभरात अनेकांना सतावत असतात. त्यांमागच्या नेमक्या कारणांचे निदानही अनेकदा होत नाही.
बऱ्याचजणांना निदान करून घेणेही तितकेसे गरजेचे वाटत नाही. त्यामुळे हा त्रास वाढतच जातो. अशा प्रकारच्या ॲलर्जी योग्य निदान वेळीच झाल्यास संभाव्य धोके टाळता येतात त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ तज्ञांचा सल्ला घ्यावा असे आव्हान सुरत येथील एलर्जीस्ट आणि चेस्ट फिजिशियन डॉ.मिलन मोदी यांनी केले. या शिबिरात २०० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
महावीर मंडळ तळोदा व तुलसी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत एलर्जी रोग निदान शिबिर व मधुमेह व हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन तळोदा येथील जैनवाडी येथे रविवारी करण्यात आले होते.
याप्रसंगी ते बोलत होते. शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी डॉ. मिलन मोदी डॉक्टर रोशन भंडारी माजी उपनगरध्यक्ष गौतम जैन, हंसराज भंडारी, दिलीप शेठीया, कांतीलाल जैन नरेश जैन, राजेंद्र जैन, मनीष सेठीया, विनय जैन, दिनेश बोरा, अल्पेश जैन निलेश पारख, चंद्रकांत जैन, महेंद्र जैन यांचा सह महावीर मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
शिबीरात सर्व मधुमेही रुग्णांना या मूलतत्त्वे काय काळजी ? कोणता आहार घ्यावा ? कोणते व्यायाम करावे ? धोक्याची घंटा ओळखावी ? पायची निगा सुरक्षित ठेवणे ? याबाबत हृदयरोग डायबिटीस फिजिशियन नंदुरबारचे डॉ. रोशन भंडारी यांनी शास्त्रोक्त पध्दतीने माहिती दिली आहे. २०० रुग्णांची तपासणी या शिबिरात करण्यात आली. डॉ.रोशन भंडारी, डॉ.मीनल मोदी यांच्यासह तळोदा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शहरातील डॉ.जगदीश मगरे, डॉ.जिग्नेश देसाई डॉ.पंकज पारेख, श्रीमती डॉ.बडगुजर, डॉ. पंजराळे, डॉ. अमर राजकुळे, डॉ. सुनिल लोखंडे, आदींनी सहकार्य केले....