Type Here to Get Search Results !

संविधानाचे वाचन करुन महिलांनी मुंलाना घडवले पाहिजे उपसभापती प्रदीप वाघ यांचे महिलांना आवाहन


संविधानाचे वाचन करुन महिलांनी मुंलाना घडवले पाहिजे उपसभापती प्रदीप वाघ यांचे महिलांना आवाहन

 मोखाडा :सौरभ कामडी 
दि. 5 जानेवारी रोजी वाडा तालुका येथे महादेव कोळी समाज उन्नती मंडळ च्या संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या म हिला स्नेह संमेलन ‌समारंभात श्री प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी समाजाला विकासाच्या दृष्टीने पुढे जायचे असेल तर आपले हक्क आपले अधिकार माहिती करून घ्यायची असेल तर शाळेतील मुली मुली यांनी सर्वच लोकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाचे वाचन केले पाहिजे, भारतीय संस्कृती ही मातृसत्ताक असुन , महिला च समाजाला पुढे घेऊन जात आहेत,



 आदिवासी महिलांनी महाराष्ट्र शासनाने 50% आरक्षण दिलेले आहे तर ते आरक्षण पाहता महिलांनी सर्वच कामांमध्ये महिलांनी पुढे येण्याची आज गरज आहे. समाजाच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले पाहिजे.व आपल्या संस्कृतीचे संवर्धन देखील केले पाहिजे, समाजातील अनिष्ट प्रथा बंद करून नवीन आदर्श नव्या पिढीला दिला पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. .यावेळी कर्तबगार महिलांना सन्मानित करण्यात आले.तसेच महिलांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेले भारतीय संविधान महिलांना वापट करण्यात आले.तसेच सर्व कार्यक्रम दरम्यान उपस्थितांना श्रीमंत राजे यशवंतराव मुकणे महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
यावेळी उपस्थित श्री मगन पाटील विश्वस्त, श्री प्रदीप वारघडे सरचिटणीस, श्री संतोष पाटील, किशोर भवारी, दिगंबर पाटील, श्रीमतीसंजना बेंडकोळी, श्रीमती संगीता भांगरे, श्री रांगसे सर, श्री कोथे दादा, श्री महेश शितोळे, श्री संदीप वारघडेश्रीरनजित बेंडकोळी, जगन खिरमिडे,सौ.गीता पाटील, मंगेश दाते, नंदकुमार वाघ, गणेश खादे, पुंडलिक पाटील,भुषण फाळके,स्वप्निल भवारी इत्यादी पदाधिकारी व मोठ्या संख्येने जव्हार, मोखाडा विक्रमगड व वाडा तालुक्यातील महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News